शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागेची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: January 12, 2017 00:34 IST

महाराष्ट्र शासनाच्या मालकीची ८०० चौ.फुट आबादी जागा परस्पर विकून लाखो रूपये हडप करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.

आर्वी : महाराष्ट्र शासनाच्या मालकीची ८०० चौ.फुट आबादी जागा परस्पर विकून लाखो रूपये हडप करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच सदर जागा खरेदी करून भ्रष्ट कारभाराला मदत करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून सदर जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने केली आहे. यावर कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. शहरात अनेक जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. माजी नगरसेवक व मोतीराम वानखेडे यांनी येथील जागेवर अतिक्रमण केले आहे. पदाचा गैरवापर करीत सदर जागा नगर परिषदेच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या स्वत:च्या नावावर केली. प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यात फक्त १०० चौ.फुट जागा होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २०१३ मध्ये दस्ताऐवजामध्ये परस्पर फेरफार करून मालमत्ता रजिस्टरवर १०० चौरस फुटाऐवजी ८०० चौरस फुटांची नोंद घेतली. सदर जागा शासकीय मालकीची आहे हे माहीत असताना मोतीराम वानखेडे यांच्या वारसांनी ती जागा परस्पर विकून १ लाख ८० हजार रूपये हडप केले आहे. नगर परिषद दस्ताऐवजात फेरफार करून नोंद घेतलेली जास्तीची ७०० फुट जागा नगर परिषदेने ताब्यात घेवून मालमत्ता रजिस्टरवर घेतलेली नोंद रद्द करण्यात यावी. शासकीय जागेची परस्पर खरेदी विक्री करून लाखो रूपये हडप करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महादेवबाबा वॉर्डातील प्राथमिक शाळेजवळील आयुर्वेदीक दवाखाना क्र. १ मधील साहित्य व सागवानचे फर्निचर चोरीला गेल्याची तक्रार दिली. यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. अज्ञात इसमांनी दवाखाना तोडून येथील साहित्याची तोडफोड केली असून वस्तू लंपास केल्या. याची चौकशी करून कारवाईची मागणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना भाजयुमोचे बाळा जगताप यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका/शहर प्रतिनिधी)