शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांच्या आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: September 8, 2016 00:45 IST

कर्मचाऱ्याच्या माध्यमातून नरबळी देण्याचा अयशस्वी प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव(रेल्वे) तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज

नरबळी प्रकरण : लहूजी शक्ती सेनेचे आंदोलनआर्वी : कर्मचाऱ्याच्या माध्यमातून नरबळी देण्याचा अयशस्वी प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव(रेल्वे) तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रम शाळेत घडला. त्यामुळे शंकर महाराज आश्रम शाळेतील ट्रस्टीवर कारवाई करून या आश्रम शाळेची मान्यता रद्द करावी. सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेद्वारे आर्वी येथील उपविभागीय कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. ११ वर्षांचा प्रथमेश सगणे या मातंग समाजाच्या मुलाचा आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी गळा कापून अघोरी विद्या प्राप्त करण्याकरिता जीव घेण्याचा प्रयत्न झाला. सदर प्रकरणात शंकर महाराज व आश्रम शाळेतील ट्रस्टींचा सहभाग होता. यापूर्वी अजय वनवे या मुलाचाही नरबळी देण्याचा प्रयत्न झाला होता. असे प्रकार शंकर महाराज आश्रम शाळा, पिंपळखुटा येथे वरचेवर होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सी.आय.डी. चौकशी करून मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्यसंघटक अ‍ॅड. गणेश हलकारे यांनी पिंपळखुटा नरबळी प्रकरणाचा पंचनामा या विषयावर मार्गदर्शन केले. आंदोलनात लहूजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष डॉ. रूपेश खडसे विदर्भ कार्याध्यक्ष लहानुजी इंगळे, राजेश अहीव, दिलीप पोटफोडे, दशरत जाधव, दिलीप पोटफोडे, राजेश अहीव, सुधाकर लाडंगे, मंगेश लाडंगे, बबन गायकवाड, मंगेश प्रधान, संग्राम कळणे, पंकज जाधव, सुनील संतापे, गौरी वाघमारे, विनय इंगळे, अनिल पोटफोडे, अक्षय कांबळे, सतीश पिठे, किशोर बावणे आदी सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)