जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे पुलगाव : येथील इंदिरा मार्केट परिसरात केलेले अतिक्रमण काढण्यात येऊन ही जागा मोकळी करावी. धार्मिक ध्वज परिसरात लावलेली झाडे तोडून काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांनी येथे अतिक्रमण केले. दरवर्षी या जागेवर महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. अतिक्रमणामुळे कार्यक्रमाला जागा नसल्याने त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून केली.या मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, पुलगाव यांच्यावतीने भन्ते राजरत्न यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले. येथे दरवर्षी कार्यक्रम आयोजित केल्या जातो. मात्र त्यासाठी जागाच नसल्याने ती जागा पूर्ववत खाली करण्याची मागणी अशोक मात्रे, चंद्रमनी सहारे, गौतम गजभिये, डी.एस. धोंगडे, सुनिल ढाले, गजानन नाईक, साहिल पाटील, सिध्दार्थ वासनिक आदींनी केली.(तालुका प्रतिनिधी)
इंदिरा मार्केट समोरील अतिक्रमण हटवा
By admin | Updated: April 11, 2017 01:21 IST