बसपाचा सहभाग : विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सहभागपुलगाव : निराधारांचे मानधन त्वरित मिळावे या मागणीकरिता बहुजन समाज पार्टीच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी १०० वर निराधार वृद्ध उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांनी निवेदन घेत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे २,०४३, श्रावण बाळ योजनेचे ७००९, वृद्धापळा पेंशन योजनेचे ५१८८, अपंग ४७ आणि विधवा ९१ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना गत सात महिन्यापासून मानधन मिळाले नाही. आॅनलाईन प्रक्रियेमुळे अनुदान रखडले असल्याचे शासकीस अधिकारी सांगत आहे. मानधन नसल्याने निराधार लाभार्थ्यांचे उपासमार होत आहे. यापुर्वी बीएसपीच्या वतीने २८ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण मानधन जमा झाले नाही.
मानधनासाठी निराधारांचा ठिय्या
By admin | Updated: September 5, 2015 01:51 IST