शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मृग कोरडाच, बळीराजाची आर्द्रावर भिस्त

By admin | Updated: June 23, 2014 00:13 IST

रोहिणीपाठोपाठ मृगही कोरडा जात आहे. रोहिणीत पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना मृगसरींची प्रतीक्षा होती. मात्र मृगात पाहिजे तशा सरी कोसळल्या नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पावसाची हुलकावणी : शेतकरी चिंतातुर; सोयाबीनचा पेरा नाही, केवळ कपाशीची लागवड वर्धा : रोहिणीपाठोपाठ मृगही कोरडा जात आहे. रोहिणीत पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना मृगसरींची प्रतीक्षा होती. मात्र मृगात पाहिजे तशा सरी कोसळल्या नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आता त्याची आशा रविवारपासून सुरू झालेल्या आद्रावर आली आहे. आद्राचा पहिला दिवस कोरडाच जाण्याची चिन्हे दिवसभर होती. येथेही पावसाने जर डोळे वटारले तर यंदा जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट आहे.गत हंगामात जून महिन्यापासूनच पावसाची हजेरी लागली होती. यामुळे जून महिन्याच्या अखेरीपर्यंत जिल्ह्यात ८० टक्के पेरा आटोपला होता. गत वर्षी चांगले उत्पन्न होईल अशी आशा असताना प्रारंभीपासून आलेला पाऊस अखेरीस अतिवृष्टी ठरला. यामुळे हातचे उत्पन्न गेले. यंदा मात्र या उलट परिस्थिती आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे यंदा कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना अशी शंका वर्तविली जात आहे. मृगाच्या सुरुवातील पावसाच्या थोड्या सरी पडल्याने शेतकऱ्याने त्याच्या कामाला गती दिली. आज चांगला पाऊस येईल, उद्या येईल या आशेत बळीराज असताना रोज आकाशात ढग दाटून येतात व सायंकाळी निघून जातात. पाऊस मात्र येत नाही. यामुळे त्याची चिंता आणखीच वाढली आहे.मृग नक्षत्रात खरीपाची बऱ्यापैकी पेरणी ओटोपते. यंदा मात्र तसे चित्र नाही. मृगाच्या प्रारंभी आलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली. तर काहींनी पावसाच्या प्रतीक्षेत शेतात कपाशीची बियाणे टाकून ठेवली आहेत. ज्यांनी पहिल्या पावसात कपाशीची लागवड केली त्यांची कपाशी उगविली असून पावसाअभावी ती करपण्याच्या मार्गावर आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्याला अद्याप सुरुवात झाली नाही. मृगात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावधानी बाळगत अद्याप सोयाबीनचा पेरा टाळला. यामुळे सोयाबीनची पेरणी आद्रा नक्षत्रातच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यातही आद्रा कोरडा गेला तर खरीप शेतकऱ्यांच्या हातचा गेल्यातच आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)