शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दीपकची आत्महत्या नसून हत्याच

By admin | Updated: June 30, 2014 00:02 IST

भारतीय सैन्य दलाचा शिपाई व नाचनगाव येथील वॉर्ड क्रमांक ४ गाडगेनगर येथील दीपक शंभरकर खंडारकर (३४) याचा १९ जून रोजी रेल्वे रूळावर मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक

वडिलांचा आरोप : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पुलगाव : भारतीय सैन्य दलाचा शिपाई व नाचनगाव येथील वॉर्ड क्रमांक ४ गाडगेनगर येथील दीपक शंभरकर खंडारकर (३४) याचा १९ जून रोजी रेल्वे रूळावर मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दीपकची आत्महत्या नसून तो घातपात असल्याचा संशय त्याच्या वडीलांनी व्यक्त केला. यामुळे त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्याचे वडिल शंकर खंडारकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली़दीपक हा ७ महार रेजिमेंट आसाम(हाशीमारा) येथे सैन्यात नायक पदावर कार्यरत होता़ तो विवाहानिमित्त रजेवर आला होता़ १६ जून १४ रोजी त्याचा बेलोरा येथे विवाह झाला. १७ जूनला त्याच्या लग्नाचा स्वागतसमारोहाचा कार्यक्रम झाला. तो १८ जूनला सासरी बेलोरा येथे सत्यनारायण पूजेसाठी गेला होता़ हा कार्यक्रम आटोपून तो त्याच दिवशी पत्नीसोबत पुलगावला आला़१९ जून रोजी सायंकाळी ४़३० वाजता बाहेर जावून येतो असे सांगून दीपक बाहेर गेला तो परत आलाच नाही़ मध्यरात्री पर्यंत परिवारातील लोकांनी त्याचा शोध घेतला; परंतु शोध न लागल्यामुळे त्याचे वडिल रात्री ३ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी गोड सल्ला देवून जबाबदारी टाळली़२० जूनला रेल्वे लाईनवर त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले़ दीपक घरून गेला तेव्हा त्यांच्या बोटात सोन्याची अंगठी मोबाईल व रोख राशी होती; परंतु त्याच्या मृतदेहाजवळ यापैकी काहीच आढळले नाही़ यामुळे ही आत्महत्या नसून माझ्या मुलाचा घातपाती मृत्यू असल्याचे निवेदनात नमूद करून त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)