शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

क्रीडा संकुल ठरतेय शोभेची वास्तू

By admin | Updated: January 10, 2015 23:01 IST

शासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथील तालुका क्रीडा संकुलाची वास्तू शोभेची ठरत आहे़ प्रशासकीय उदासिनतेमुळे चांगल्या उपक्रमाला गालबोट लागत आहे़ ही वास्तू कोणत्याही प्रकारची सुविधा

हरिदास ढोक - देवळीशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथील तालुका क्रीडा संकुलाची वास्तू शोभेची ठरत आहे़ प्रशासकीय उदासिनतेमुळे चांगल्या उपक्रमाला गालबोट लागत आहे़ ही वास्तू कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने शोभेची वास्तू ठरत आहे़ तालुका क्रीडा अधिकाऱ्याच्या तुघलकी कारभारामुळे खेळाडुंसह अधिकारीही त्रस्त झाले आहे़स्थानिक नगर परिषद ले-आऊट येथे एक कोटी रुपये खर्च करून तालुका क्रीडा संकुलाची वास्तू उभारण्यात आली आहे; पण येथे कुठेही खेळाची व्यवस्था करण्यात आलेली नाही़ यामुळे खेळाडूंचा हिरसमोड होत आहे. संकुलाची वास्तू नेहमीच बंद राहत असल्याने टेबल टेनिस व बॅटबिंटन कोर्ट यासारख्या खेळांपासून खेळाडुंना वंचित राहावे लागत आहे. मल्लखांब, डबलबार, सिंगलबार आदींची व्यवस्था नसल्याने सरावासाठी स्थानिक आखाड्यातील साहित्यांचा आधार खेळाडुंना घ्यावा लागत आहे. कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल या खेळांसाठी अधिकृत पीच (ग्राऊंड) तसेच रनिंग ट्रॅक तयार नसल्याने खेळाडुंचा उत्साह मारला जात आहे. ग्राऊंडवर बॉलची व्यवस्था नसल्यसाने खेळाडूंना स्वत:च बॉल आणून काम भागवावे लागत आहे.क्रीडा संकुल परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज व प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम करण्यात आलेले नाही़ संकुलाला सुरक्षा भिंत नसल्याने परिसरात मोकाट गुरांचा संचार असतो़ पिण्याच्या पाणीची टाकी नियमित भरली जात नाही़ यामुळे खेळाडुंना परिसरातील घरांचा आधार घ्यावा लागत आहे. क्रीडा प्रशिक्षक गांडोळे यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रशिक्षक व कर्मचारी संकुलावर उपस्थित राहत नसल्याने अडचणी आहे. तालुका क्रीडा अधिकाऱ्याचे पद पूर्णवेळ व वर्ग-२ मध्ये मोडणारे असताना रंगारी या कधीकाळीच कार्यालयात येतात़ याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनेसाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. यात पं.स. गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी, बांधकाम विभाग व इतर अधिकारी सदस्य आहेत; पण संकुलाच्या कार्यपद्धतीवर संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत खेळाडुंना प्रोत्साहन देण्याकरिता क्रीडा संकुल सुरळीत करणे गरजेचे आहे़