शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायाचे विकेंद्रीकरण हाच सर्वोदयचा मूलमंत्र होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:32 IST

महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे.

ठळक मुद्देआदित्य पटनायक : ‘महात्मा गांधी व विकासाची दिशा’ विषयावर व्याख्यान

ऑनलाईन लोकमतवर्धा : महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे. सर्वांना समान वाटा यानुसार व्यवसायाचे केंद्रीकरण नाहीतर विकेंद्रीकरण हाच महात्मा गांधी यांच्या सर्वोदयाचा मुलमंत्री होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय सर्वोदय समाजाचे राष्ट्रीय संयोजक आदित्य पटनायक यांनी केले.स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात महाराष्ट्र अंनिस, राष्ट्रसेवा दल व अनेकान्त स्वाध्याय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी संस्था, संघटना समन्वय समिती यांच्या सहकार्याने ४५ व्या अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘महात्मा गांधी व विकासाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खादी व ग्रामीण व्यवसाय संस्थेचे लक्ष्मीभाई, सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, महाराष्ट्र अंनिसचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवा दलाचे सचिव अविनाश सोमनाथे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.पटनायक पुढे म्हणाले, महात्मा गांधीच्या नावावर अनेक आक्षेप आहे. विशेषत: सेवाग्राम आश्रमामुळे वर्धा जिल्ह्याचा विकास थांबला, असे बोलल्या जाते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या विषयी क्लेषाची भावना तरूणांमध्ये निर्माण झाली. याला राजकारणी, राजकीय पक्ष, संघटना कारणीभूत आहे. महात्मा गांधी छोट्या-छोट्या उद्योग उभारणीच्या बाजूने होते. खेड्यातील उत्पादनावर कच्चा मालावर प्रक्रिया उद्योग गावातच उभे राहिल्यास ग्रामीण भागात रोजगार वाढून आर्थिक संपन्नता गावात येईल, सर्वांना काम मिळेल;पण ही दृष्टी स्वातंत्र्यनंतर अमलात आली नाही. आज मोठमोठ्या मशीनमुळे हातचा रोजगार गेला. संपत्तीचे केंद्रीकरण होवून मुठभर लोक श्रीमंत झाले. तर गरीब अधीक गरीब होवून तरूणांच्या हाताचे उद्योग जावून तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले. हे १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला परवडणारे नाही. आजही गांधीच्या सर्वोदय विचारांची गरज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. खेड्यांमध्ये उद्योग उभारणे, गावातच रोजगार उपलब्ध करून दिले तरच शेतकरी आत्महत्या थांबून बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सुनील सावध यांनी केले तर उपस्थितांचे आभार सारिका डेहनकर यांनी मानले.गांधी विषयीच्या क्लेषाला संकुचित विचार जबाबदारमहात्मा गांधीच्या नावावर अनेक आक्षेप आहे. महात्मा गांधी यांच्यामुळे भारतात औद्योगिक प्रगती होवू शकली नाही. तर सेवाग्राम आश्रमामुळे वर्धा जिल्ह्याचा विकास थांबला, असे बोलल्या जात असून यामुळे महात्मा गांधी यांच्याविषयी क्लेषाची भावना तरूणांत निर्माण झाली. याला राजकारणी व राजकीय पक्ष जबाबदार कसे आहे हेही पटनायक यांनी स्पष्ट केले.