शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

मृताची ओळख पटली अन् आरोपीही गवसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:55 IST

मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी शिवारातील हत्याकांडाच्या तपासावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार दिवसाच्या अथक परिश्रमाने पडदा पडला. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासोबतच आरोपीलाही अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देजोलवाडी हत्या प्रकरण : अनैतिक संबंधातून केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी शिवारातील हत्याकांडाच्या तपासावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार दिवसाच्या अथक परिश्रमाने पडदा पडला. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासोबतच आरोपीलाही अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे.आरोपी आणि मृत दोघेही अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील आहे. बेबी रमेश घोरपडे (४१) रा. चितरगव्हाण असे मृताचे तर वैभव देशमुख (३४) रा. गोरेगाव, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बेबी ही विवाहित असून तिला दोन मुली व एक मुलगा आहे. काही दिवसापूर्वी पतीचे निधन झाल्याने ती आपल्या मुलाबाळासोबत राहत होती. या दरम्यान वैभवशी तिचे सूत जुळले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. जुलै महिन्यात वैभवचा विवाह असल्याने बेबीचा त्रास चांगलाच वाढला होता. त्यामुळे तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने एमएच २७ एआर ०९८८ क्रमांकाच्या कारमध्ये बसवून तिला जोलवाडी परिसरात आणले. तेथे दोघांनी मद्यप्राशन करुन शरीर सुख घेतले. त्यानंतर चाकूने वार करुन तिला जागीच ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व गुन्हे शाखेचे निरिक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेंद्र इंगळे, सहायक उपनिरिक्षक नामेदव किटे, नरेंद्र डहाके, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, नितीन मिटकरी, आत्माराम भोयर, मुकेश येल्ले यांनी केली.पोलीस चार दिवस तळ ठोकूनआष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतांना तेथील पोलिसांना तपासाची गतीच मिळाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते. हाती कोणताही ठोस पुरावा नसतानाही या पथकाने अमरावती जिल्ह्यात चार दिवस ठाण माडून प्रत्येक पोलीस ठाण्यातील तक्रारींची नोंद घेत पुरावा शोधून काढला. वरुड पोलीस ठाण्यात बेबी घोरपडे मिसिंग असल्याची नोंद होती. पोलिसांनी त्याच आधारे तपास केला असता तीचे आरोपी वैभव सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वैभवला गोरेगाव येथून ताब्यात घेत विचारपूस केली असता. त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.