शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महा.विद्युत निगममधील कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: June 18, 2017 00:34 IST

छातीत दुखत असल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कामगाराचा काही तासांतच मृत्यू झाला.

ंअंत्यसंस्काराच्या वेळी काळवटले शरीर : शवविच्छेदन न करताच सोपविले पार्र्थिव लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : छातीत दुखत असल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कामगाराचा काही तासांतच मृत्यू झाला. नियमानुसार मृताचे शवविच्छेदन करणे आवश्यक होते; पण तसे न करता मृत कामगाराचे पार्थिव पत्नीच्या स्वाधीन करण्यात आले. कळंब तालुक्यातील सावरगाव येथे अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मृताचे शरीर काळे पडल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करून मृतदेह पुन्हा देवळी येथे घटनास्थळी आणण्यात आले. हा सर्व घटनाक्रम शुक्रवारच्या रात्रीपर्यंत सुरूच होता. वर्धा सामान्य रुग्णालयात शनिवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतरच पार्र्र्थिव ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम येथे कार्यरत विलास पुंडलीक वावरकर (४५) हा कामगार कंपनीच्या सकाळ पाळीत कामावर होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी कंपनीत रुजू झाल्यानंतर सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्याच्या छातीत दुखत असल्याने त्यांना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान काही तासांच्या अवधीत सकाळी ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कामगाराचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे कारखाना प्रशासन व रुग्णालयातून सांगण्यात आले. शवविच्छेदन न करता नियमांना डावलून हा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी मृताचे शरीर काळे पडल्याचे एकच गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेऊन हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला. त्यामुळे संबंधित मृतदेह नजीकच्या कळंब पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. परंतु याप्रसंगी कळंब पोलिसांनी सहकार्य न करता मृतदेहाची अवहेलना केली. अश्या प्रकारचा आरोप कुटुंबियांनी केला. त्यानंतर संतप्त कुटुंबियांनी देवळीचे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विद्युत निगमचे कार्यालय गाठून रोष व्यक्त करण्यात आला. कामगाराचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याने शवविच्छेदनाची गरज नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे संबंधित मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. हा कामगार ठेकेदारी पद्धतीतील असल्याने त्यांना नियमाप्रमाणे विमा सुरक्षा रक्कम मिळणार आहे. - दीपक पराले, एच.आर. महा.विद्युत निगम, देवळी