शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:55 IST

येथील पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे (५१) यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना छातीत दुखत असल्याने पोलीस शिपाई अनिल पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देछातीत वेदना झाल्याने नेले रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : येथील पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे (५१) यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना छातीत दुखत असल्याने पोलीस शिपाई अनिल पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.पोलीस कर्मचारी अनिल पांडे हे मागील सुमारे तीन वर्षांपासून पोलीस स्टेशन सिंदी येथे पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होते. सोमवार १७ जूनला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ते स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. आरोपीची वैद्यकीय अधिकारी वंजारी यांच्याकडून तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान त्यांनी आपला बीपी तपासून घेतला. त्यांचा रक्तदाब थोडा जास्त असल्याने डॉक्टरांनी पांडे यांना औषध दिली. त्यानंतर पांडे हे आरोपीला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. दरम्यान पांडे यांची रवानगी सेलू येथील न्यायालयात आरोपी घेऊन जाण्याची करण्यात आली. त्यामुळे त्यांनी सोबत आणलेली शिदोरी पोलीस ठाण्यातच संपविली. सूर्य डोक्यावर चढत असताना ११.३० वाजताच्या सुमारास पांडे यांना छातीत दुखने सुरू झाले. शिवाय श्वास घेण्यास त्रास होत होता. सदर बाब लक्षात येताच त्यांना पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.