आकोली : नजीकच्या चोरांबा शिवारात २५ एप्रीलच्या रात्री भास्कर विठ्ठल चिकराम (२५) नामक युवकाचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासात त्याची हत्या झाल्याचे पुढे आल्याने रविवारी अज्ञातावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर चिकराम याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी केली होती. घटना नोंद करून सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ राऊत यांच्याकडे तपास सोविण्यात आला होता. तपासादरम्यान प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार भास्करचा आकस्मिक मृत्यू झाला नसून त्याची गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले. यावरून तपास सुरू असताना कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती आला नसून तो नष्ट केल्याचे उघड झाले. त्यामुळे खरांगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीवर भादंविच्या कलम ३०२, २०१ कलमान्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत (वार्ताहर)
‘त्या’ मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल
By admin | Updated: May 18, 2015 01:59 IST