तळणीत शोककळा : ट्रक चालकाला अटकइंझाळा : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले होते. रात्री उशिरा दोनही जखमींचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरात झालेल्या या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे. या घटनेने तळणी गावावर शोककळा पसरली आहे.गजानन केराम (२५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर दिनेश मेश्राम (३५) व विजय भिसे (४०) हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यामध्ये ट्रक चालक सिद्धार्थ राऊत रा. गोंदिया याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर ट्रक गॅमन कंनपनीचा असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, इंझाळा येथून एमएच ३५ के ४१५१ या ट्रकने भरधाव येत तळणी येथून दुचाकी एमएच ३२ टी २७०२ ने उपरोक्त तिघांना इंझाळा येथील बसस्थानकाजवळ जबर धडक दिल्याने हा अपघात घडला.(वार्ताहर)
‘त्या’ अपघातातील दोनही जखमींचा मृत्यू
By admin | Updated: June 18, 2016 01:32 IST