शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

बंद पथदिव्यांमुळे पुलावर काळोख

By admin | Updated: June 11, 2017 00:52 IST

शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत.

नगर पालिका प्रशासनाचा कानाडोळा : युथ फाऊंडेशनची उपविभागीय कार्यालयावर धडक लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य असते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अजय मडावी युथ फाऊंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना प्रशासन उड्डाणपूल तसेच अन्य मार्गावरील बंद पथदिव्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत उड्डाणपुलावर तसेच महामार्ग क्र. ७ वरील पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी फाऊंडेशनचे लिलाधर मडावी यांनी केली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावण्यात आलेले पथदिवे बंद पडलेले आहेत. या परिसरात तथा उडाणपुलावर दररोज नागरिक पहाटे तसेच रात्री फिरायला जातात; पण पथदिवे बंद असल्यामुळे काळोख पसरलेला असतो. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फिरायला येणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असतो. पुरुष तसेच महिला सायंकाळी जेवण झाल्यानंतरही फिरायला जातात. यात भरधाव वाहने चालविणाऱ्यांचा वा गुन्हेगारांचा धोका संभवतो. वेगात वाहन चालविणाऱ्यांमुळे या परिसरात सातत्याने अपघात झाले आहेत. यामुळे परिसरातील पथदिवे सुरू करणे गरजेचे झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास याच महामार्गावर बहिणीला दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेत असताना अतुल गजभीये याच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली होती. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही पथदिवे सुरू करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे वीज देयक भरण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. एका कंपनीकडून वडनेर लगत टोलनाक्यवर टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल केली जात नाही. वीज बिलाची रक्कम न भरता पथदिवे बंद ठेवत नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार त्वरित थांबवावा. पथदिवे सुरू करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शहरातील त्रस्त नागरिक व फाउंडेशनने दिला. निवेदन देताना लिलाधर मडावी, पंकज वानखेडे, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, अनिकेत सहारे, शुभम ठाकरे, गोलू शिंदे, सौरव वानखेडे, सागर मुडे, विक्की जुमडे, संतोष येनोरकर, गौरव नंदागवळी, प्रज्वल भगत, साहिल भगत, गोपाल जाखोटिया, अजय मंगेकर, प्रसाद धनवटे, धीरज चौधरी आदी उपस्थित होते. टोल वसुली करूनही पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावण्यात आले. हे पथदिवे विद्युत देयक अदा न केल्याने बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक, या पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी टोल नाक्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर लगत एका कंपनीद्वारे वाहन धारकांकडून टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती केली जात नसल्योचच दिसून येत आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गासह उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. नगर पालिका, जिल्हा प्रशासन व टोल कंपनीने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावरील तसेच महामार्गावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. पथदिवे देतात पुलाखाली प्रकाश सेवाग्राम : शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी उड्डाणपुलावर पथदिवे लावण्यात आलेले आहेत. यातील काही पथदिवे उड्डाणपुलावर तर काही पथदिवे पुलाच्या खालील भाग प्रकाशमान करीत असल्याचे दिसते. बहुतांश पथदिव्यांचे तोंड विरूद्ध दिशेने झाल्याने त्यांच्या प्रकाशाचा उपयोग कुणाला, हा प्रश्नच आहे. याच पुलाजवळ हायमास्ट असून काही महिन्यांपासून तो बंद आहे. यातीलही अर्धे दिवे आकाशाच्या दिशेने झाले आहे. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर मात्र काळोखाचेच साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे.