शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कपड्याच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:39 IST

विठोबा चौकातील सुरेश बसंतानी यांच्या मालकीच्या कपड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या प्रमाणात कपडे जळून कोळसा झाल्याने त्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे२० लाखांचे नुकसान : दोन दिवसातील तिसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : विठोबा चौकातील सुरेश बसंतानी यांच्या मालकीच्या कपड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या प्रमाणात कपडे जळून कोळसा झाल्याने त्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसात आग लागल्याची ही तिसरी घटना आहे.प्राप्त माहितीनुसार, विठोबा चौक परिसरात सुरेश बसंतानी यांच्या मालकीचे कपड्याचे दुकान व तेथेच कपड्याचे गोदाम आहे. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास याच गोदामातून धूर निघत असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडा-ओरड केल्याने घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. आग लागल्याचे लक्षात येताच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न सुरू झाले. दरम्यान घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच न.प.च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. शिवाय आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोपर्यंत आगीने गोदामातील संपूर्ण कपड्यांना आपल्या कवेत घेतले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील व्यावसायिकांनीही सहकार्य केले. या आगीत चादर, सतरंजी, पडदे, गालीछा आदी साहित्य जळून कोळसा झाल्याने व्यावसायिक बसंतानी यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी अशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे दोन दिवसातील ही तिसरी घटना असून यापूर्वी विठोबा चौकातील खिलवानी यांच्या दुकानाला तर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या निवास स्थानाच्या मागील भागात आग लागली होती.

टॅग्स :fireआग