शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाहीतपूर-पवनार मार्गावरील रपटा धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:02 IST

तालुक्यातील वाहितपूर गावातून पवनारला एमआयडीसी पुलामार्गे जाणाऱ्या रस्त्याचे अर्धा कि़मी.चे डांबरीकरण अपूर्ण आहे. शिवाय गावाजवळील नाल्यावरील पुलाचा रपटा पुरामुळे वाहून गेल्याने येथून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. सदर रपट्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांची आहे.

ठळक मुद्देवहिवाटीचा प्रश्न ऐरणीवर : अपघात होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील वाहितपूर गावातून पवनारला एमआयडीसी पुलामार्गे जाणाऱ्या रस्त्याचे अर्धा कि़मी.चे डांबरीकरण अपूर्ण आहे. शिवाय गावाजवळील नाल्यावरील पुलाचा रपटा पुरामुळे वाहून गेल्याने येथून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. सदर रपट्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांची आहे.रपटा खचल्याने पुलाच्या दोन्ही बाजुला सुमारे १० फुट रुंद व ५ फुट खोलीची दरी तयार झाली आहे. वाहनचालकांना या मार्गाने ये-जा करताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. शिवाय साधे पायी जाणे ही धोक्याचे ठरत आहे.या ठिकाणी दररोज छोट-छोटे अपघात होत आहेत. याच मार्गाने विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत असून रात्रीच्या सुमारास पुलाचा खचलेला भाग सहज दिसत नसल्याने एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे.संभाव्य धोका लक्षात घेता रपटा दुरूस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे तालुका सरचिटणीस संजय अवचट यांनी आ. डॉ. पंकज भोयर यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. येत्या काही दिवसात दुरूस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या मार्गासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.कामाची झाली होती घोषणापवनार येथील अनेक शेतकऱ्यांची शेती वाहितपूर येथे आहे. त्यांना नाल्यातून वाट काढत किंवा डोंग्याच्या सहाय्याने जावे लागते ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पवनार ते वाहितपूर दरम्यान पूल व रस्ता बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी पनवार येथे केली होती. अनेक शेतकºयांनी या निर्णयाचे स्वागतही केले होते. मात्र अजून काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.