शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: March 11, 2015 01:45 IST

तालुक्यात डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. डास पळविण्यासाठी अगरबत्ती व कॉईल्सचा वापर वाढल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

सेलू : तालुक्यात डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. डास पळविण्यासाठी अगरबत्ती व कॉईल्सचा वापर वाढल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सांडपाणी वाहुन जाण्यासाठी गावागावांमध्ये बांधण्यात आलेल्या नाल्या बहुतांश ठिकाणी गाळांनी तुंडूब भरल्या आहेत. या कारणाने डासांची उत्त्पत्ती झपाट्याने होत आहे. सायंकाळच्या वेळी घरातील मंडळीना डास निवांत बसु देत नाही. यामुळे फॅन चा आसरा घ्यावा लागत आहे. विजेची बचत करण्याचा मानस असला तरी डास चावल्यास हिवताप होऊ नये म्हणून विजेचा वापर करावाच लागत आहे. तरीही डास ऐकायला तयार नसल्याने डास घरातून पळविण्यासाठी अगरबत्त्या वापराव्या लागत आहे. डासाचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. असे असतानाही तालुक्यातील आरोग्य विभागाचे याकडे फारसे लक्ष दिसत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहे. धुरळणी साठी असणाऱ्या फॉगिंग मशीनची बहुतांश ग्रामपंचायतीनी खरेदी केली असली तरी त्या मशिनी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येते. डी. डी. टी. ची फवारणी काल बाह्य झाली आहे. त्यामुळे थंडी वाजून ताप येण्याच्या रुग्णांची गर्दी खासगी रुग्णालयांमध्ये वाढत आहे. अनेक प्रकारच्या तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ग्रामीण रुगणालयातील बाह्य रुग्ण विभागातही गर्दी दिसून येत आहे. डासाचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊले गावाकडे वळविण्याची गरज आहे. परंतु तसे होत नसल्याने व नाल्यांची सफाई नियमित होत नसल्याने आजाराची शक्यता बळावली आहे. स्थानिक प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. तसेच फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी करण्याची मागणीही होत आहे.(शहर प्रतिनिधी)