शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराचे ओझे वाढल्यास मुख्याध्यापकांवर गदा!

By admin | Updated: December 4, 2015 02:17 IST

विद्यार्थ्याच्या पाठीवर वाढत असलेल्या दप्तराच्या ओझ्यामुळे त्याचा शारीरिक विकास खुंटत असल्याचे समोर आले आहे.

शासनाच्या आदेशाकडे जिल्ह्यात कानाडोळा : शिक्षक संघटनांकडून घेतला जातोय आक्षेपप्रभाकर गायकवाड पिंपळखुटाविद्यार्थ्याच्या पाठीवर वाढत असलेल्या दप्तराच्या ओझ्यामुळे त्याचा शारीरिक विकास खुंटत असल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत अमंलबजावनी करून अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या आकाराची व वजनाची निश्चिती करणे गरजेचे होते. मात्र या संदर्भात जिल्ह्यात अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती शिक्षण विभागाकडे देणे गरजेचे असताना तसा कुठलाही अहवाल त्यांच्याकडे आला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिक्षण विभागाकडून राबविलेल्या मोहिमेत वा कुण्या पालकाची तक्रार आल्यास या प्रकाराला शाळेच्या मुख्याध्यापकाला जबाबदार पकडण्यात येणार असल्याचे शासनाच्या या आदेशात नमूद करण्यात आले आहे. परिणामी शासनाच्या या निर्णयाचा शिक्षक संघटनांकडून विरोध सुरू झाला आहे. यामुळे या प्रकाराकडे संस्थाचालकांनीही लक्ष देणे गरजेचे झाले आहे. या दोनही घटकांनी लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांच्या हिताचा असलेला हा निर्णय योग्य ठरेल असे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कारवाई होताना दिसत नाही. शिक्षण विभागाच्यावतीने अद्याप जिल्ह्यात एकाही शाळेत भेटी दिल्या नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आजही अनेक शाळांत विद्यार्थ्यांच्या पाठीवर अधिचे ओझे दिसत आहे. याकडे जिल्ह्यातील विविध खासगी वा शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शाळांसह पालकांनीही याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते आहे. इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शासनाने जुलै महिन्यात निर्णय जारी केला. यात काही सूचना दिल्या आहेत; पण बहुतांश शाळांनी त्याची अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने शाळांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वाढत राहिल्यास त्याला शाळेचे मुख्याध्यापक व नियामक मंडळाने नामनिर्देशित केलेल्या एका संचालकास जबाबदार धरण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याबाबत उपाययोजना करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली होती. त्या समितीने विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्याचे दप्तर किती वजनाचे असावे, याबाबत स्पष्ट सूचना दिल्यात. हा अहवालही समितीने शासनाकडे सुपूर्द केला आहे. यावरून शासनाच्यावतीने २१ जुलै रोजी निर्णय घेतला. त्याच्या अंमलबजावणीबाबत शाळांना ३१ आॅगस्ट रोजी पत्र पाठविण्यात आले. याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयानेही याबाबत सूचना दिल्या होत्या. यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात अंमलबजावणी करणे गरजेचे होते. तयारीसाठी तीन महिन्यांचा कालावधी शाळांना देण्यात आला होता; पण अद्यापही अंमल झाला नसल्याचेच दिसून येत आहे.मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी लक्ष दिल्यास सहज अंमलबजावणीशासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. यामुळे त्यावर अंमलबजावणी गरजेची आहे. अभ्यासक्रम निश्चित करण्याची जबादारी मुख्याध्यापकाची असल्याने त्यांच्याकडूनच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करणे शक्य आहे. अभ्यासक्रमाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना पुस्तके आणण्याचे सांगणे शक्य आहे. या कामात मुख्याध्यापकांना शाळेच्या संचालक मंडळांनी सहकार्य केल्यास त्यांना हा निर्णय राबविणे सहज शक्य होईल. विद्यार्थ्यांच्या पाठीवर वाढत असलेले पुस्तकांचे ओझे वाढल्यास त्यांच्याकडून मुख्याध्यापकाच्या नजरेत आणून दिल्यास त्याचा लाभ होईल, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.