शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या भडक्याने सिलिंडरचा स्फोट

By admin | Updated: May 28, 2017 00:26 IST

सावंगी मार्गावरील ड्रीम लॅन्ड सिटीत चौकीदार असलेल्या ठाकरे यांच्या घराला शॉट सर्कीटने आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सावंगी मार्गावरील ड्रीम लॅन्ड सिटीत चौकीदार असलेल्या ठाकरे यांच्या घराला शॉट सर्कीटने आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने छप्पर उडाले. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी घरी कुणी नसल्याने जीवितहानी झाली नसली तरी इतर साहित्याचा कोळसा झाला. प्राप्त माहितीनुसार, सावंगी मार्गावरील ड्रीम लॅन्ड सिटीत कृष्णाजी ठाकरे हे चौकीदार म्हणून काम करीत आहेत. मागील एक-दोन दिवसांपासून हे परिवारासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी त्यांच्या घराला अचानक आग लागली. याची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. तसेच घटनेची माहिती वर्धा पालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी आगीने रौद्ररूप धारण केले. यात ठाकरे यांच्या घरात असलेल्या गॅस सिलिंडरचा भडका झाला. याची माहिती आग विझविणाऱ्यांना होण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील छताच्या चिंधड्या झाल्या. आग आटोक्यात आल्यानंतर आगीच्या कारणाचा शोध घेतला असता शॉट सर्कीटने लागल्याचे लक्षात आले. यात ठाकरे यांच्या घरातील जीवनोपयोगी साहित्याचा कोळसा झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून ठाकरे यांना मदत देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.