शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
5
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
6
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
7
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
8
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
9
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
10
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
11
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
12
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
13
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
14
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
15
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
16
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
17
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
18
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
19
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
20
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका

आॅनलाईन फसवणुकीच्या तक्रारीकडे ग्राहकांची पाठ

By admin | Updated: March 15, 2016 03:59 IST

आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. यात अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेकवेळा समोर आले

श्रेया केने ल्ल वर्धाआॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. यात अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. असे तरी या खरेदी दरम्यान झालेल्या फसवणुकीची तक्रार मात्र एकाही ग्राहकाकडून नोंदविण्यात आलेली नाही. यातून ग्राहकांमध्ये याविषयी असलेल्या जागृतीचा अभाव दिसून येतो. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना न्याय देणे व ग्राहकांना त्यांच्या हक्काविषयी जागरुक करणे हे ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रमुख उद्दीष्ट असते. याविषयी जागृती करण्यात येत असली तरी ती तितकीशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसनू येते. वर्धा येथील ग्राहक तक्रार निवारण मंचकडे यासंदर्भात अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. सध्या आॅनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा ‘ट्रेण्ड’ वाढतीवर आहे. हे लोन निमशहरी भागापर्यंत पोहचले आहे. विशेषकरुन मोबाईल खरेदी ही आॅनलाईन केली जाते. शिवाय आॅनलाईन शॉपिंग साईटसकडून ग्राहकांवर विविध आॅफर्स मधून खरेदी करीता प्रलोभने दिली जातात. यात अनेकदा ग्राहकांच्या माथी बनावट वस्तू अथवा तकलादू वस्तू दिल्या जातात. याची तक्रार कुणाकडे करावी हाच प्रश्न ग्राहकांना पडतो. आॅनलाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी वारंवार माहिती दिली जात असली तरी यामुळे झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीविषयी जागृती करणे गरजेचे झाले आहे. ३ हजार ५३८ तक्रारींचा निपटारा ४मंच स्थापनेपासून जिल्ह्यात आजवर ३,७०३ तक्रारी नोंदविण्यात आल्या. यापैकी ३,५३८ तक्रारींचा आजवर निपटारा झाला. यात १६५ तक्रारी निकालाच्या प्रतीक्षेत आहे. यापैकी काही तक्रारी विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. तीन सदस्यीय मंचाकडून यातक्रारींचा निपटारा करण्यात येतो. जिल्ह्यातील या समितीचे अध्यक्ष पी.एस. जाधव हे आहेत. तर सदस्यपदी मिलिंद केदार व स्मिता चांदेकर आहेत.ई-फोरम पोर्टल प्रस्तावित४शासन स्तरावर ई- फोरम असे पोर्टल तयार करण्यात येणार असून या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी आॅनलाईन पद्धतीने नोंदविणे तसेच तक्रारीच निपटरा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रियेची नोंद केली जाणार आहे. एका क्लिकवर तक्रारकर्त्यास संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडें असून काही महिन्यात हे पोर्टल सुरू होईल. यानंतर तक्रारकर्त्यास प्रत्यक्ष येवून तक्रार नोंदविण्याची गरज भासणार नाही. यातून तक्रारकर्त्यांना मंचकडे तक्रार नोंदविणे अधिक सहज होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी हे पोर्टल सुरु करणार असल्याची माहिती वर्धा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सहायक अधीक्षक राजेश मुक्तेश्वर यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्यक्रम४ज्येष्ठ नागरिक व विधवा महिला यांच्याकरिता ग्राहक तक्रार निवारण मंचने विशेष तरतूद केली असून या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातात. मंचकडे दाखल तक्रारींचा निपटारा करण्याची १० दिवसांची कालावधी असतो. या कालावधीत तक्रारी निकाली काढणे अगत्याचे असते. असे निर्देश आहे. यातही विधवा महिलेने अथवा ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारीकरिता अर्ज केल्यास या तक्रारींना प्राधान्यक्रम देत सोडविण्याची तरतूद केली आहे. जिल्ह्यात या अंतर्गत १७० तक्रारी दाखल असून १३८ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. ५२ तक्रारी प्रक्रियेत आहेत.