शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मोदींच्या सेवाग्राम आश्रम भेटीबाबत उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:46 IST

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमला भेट दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रपित्यांना अभिवादन केले होते.

ठळक मुद्देपोलिसांची आश्रम परिसराला भेट : २०१४ ला केले होते बापूंना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमला भेट दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रपित्यांना अभिवादन केले होते. त्यानंतर आता पाच वर्षांनंतर मोदी पुन्हा भेट देतील काय? याविषयी उत्सुकता कायम आहे. शनिवार व रविवारी पोलीस प्रशासनाने आश्रम परिसराची पाहणी करून येथील स्थिती जाणली. त्यामुळे या भेटीबाबत अद्याप अस्पष्टता आहे.लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी वर्धा लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी २० मार्च २०१४ रोजी वर्ध्यात सभा घेतली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली होती. यावेळी आश्रमचे साधक जालंधरनाथ, महात्मा गांधीजींचे नातू व निर्मला बहन गांधी यांचे पुत्र कनू गांधी, आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव उपस्थित होते.यावेळी मोदींना हिंद स्वराज्य, माझे सत्याचे प्रयोग, लोकप्रतिनिधी कसा असावा, गांधी जसे दिसले तसे स्वीकारले, आत्मकथा ही पुस्तके भेट देण्यात आली होती. श्रीराम जाधव यांनी आश्रमच्यावतीने गांधी व कस्तुरबा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने निवेदन दिले होते. कनू गांधी यांच्याशी संवाद साधला. आश्रमातील स्मारकांची माहिती घेऊन बापूकुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली. अभिप्राय नोंदवहीत आपला अभिप्राय लिहिला. विशेषत: तो गुजराती भाषेत लिहिला गेलेला आहे. आता पुन्हा विदर्भातील प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यातून करणार आहे. गांधींचे यंदा १५० वे जयंती वर्ष आहे. यानिमित्त मोदी आश्रमाला भेट देतात काय? याविषयी उत्सुकता कायम आहे. आश्रम परिसरात भेट देणार असते तर सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली असती. मात्र, अद्याप कोणतीही व्यवस्था नसल्याने केवळ चर्चेलाच या बाबत पेय फुटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक