शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने गाठला कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:12 IST

देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली.

ठळक मुद्देतिघांना अटक : कार्यालयाचे कुलूप तोडले, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली. परंतु, काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी गैरकायद्याची मंडळी गोळा करून थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या आवारात येत तेथील दोन कार्यालयाचे कुलूप तोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नवीन कार्यकारणीचा वाद धर्मदाय आयुक्त कार्यालयासह सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावर न्यायालयाकडून सूचना प्राप्त होताच आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात अविरोध निवडून आलेले नवीन पदाधिकारी वगळता उर्वरित पदाधिकाºयांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी शांततेत पार पडलेल्या निवडणुकीनंतर श्रेयासह खुर्चीचा वाद संपूष्टात आल्याचे बोलले जात होते. परंतु, निवडणूक होऊन केवळ एक महिन्याचाच कालावधी लोटता पुन्हा श्रेयवाद शनिवारी सायंकाळी उफाळून आला. जुन्या पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ ते ३० जणांनी शनिवारी सायंकाळी थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीचे आवार गाठून प्रधानमंत्री कार्यालय व आनंदकुटी अध्यक्ष निवासाचे कुलूप तोडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.सदर प्रकरणी अनंतराम सुरजप्रसाद त्रिपाठी (८५) यांच्या तक्रारीवरून सुर्यवंशी, चौधरी, जईता सेन बराट, नरेश शिखरे, गणेश धमाणे, ढोणे व इतर २० जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ४५४ व १३५ बी.पी. अ‍ॅक्ट. नुसार गुन्हा दाखल करून संजय गुजर रा. सावंगी (मेघे), नरेश शिखरे व गणेशसिंग धमाणे दोन्ही रा. राष्ट्रभाषा प्रचार समिती यांना अटक केली आहे.परिसरात दहशतसुमारे २५ ते ३० जणांनी संगणमत करून एम. एच. ३२ ई. के. ५०१७ क्रमांकाच्या दुचाकीसह इतर वाहनांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती गाठून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यात सुरूवात केली. इतकेच नव्हे तर त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही खरेखोटी सुनावल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती.