शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी गर्दी चार तास वयोवृद्ध तिष्ठत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. मात्र १८ ते ४४ वयोगटातील व त्यावरील वयोगटासाठी वेगळे भाग न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्त्रिया, वृद्ध नागरिक यांना त्रास सहन करावा लागला. ज्यांनी नोंदणी केली आहे ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांच्यासाठी वेगळी लाईन तयार करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सुधीर वाकोडकर यांनी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय यांच्याकडे केली.

ठळक मुद्देटाईम स्लॉटनुसार टोकन देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेउरवाडा/आर्वी : येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र कोणतीही बसण्याची सेवा सुविधा नसल्याने अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना चार तास तिष्ठत उभे राहावे लागल्याने गुरुवारी रोषाचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. मात्र १८ ते ४४ वयोगटातील व त्यावरील वयोगटासाठी वेगळे भाग न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्त्रिया, वृद्ध नागरिक यांना त्रास सहन करावा लागला. ज्यांनी नोंदणी केली आहे ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांच्यासाठी वेगळी लाईन तयार करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सुधीर वाकोडकर यांनी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय यांच्याकडे केली. तर याबाबत मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गर्दी पाहता दोन दिवस लसीकरणाचे वेग‌ळे शिबिर घ्यावे त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांना भाजपचे आर्वी विधानसभा क्षेत्राध्यक्ष विजय बाजपेयी यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसरी लाट ओसरली परंतु नागरिकांमध्ये पूर्व अनुभव पाहता तिसरी लाट येण्यापूर्वी आपले लसीकरण व्हावे यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहे. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत असल्याने लसीकरण केंद्रावर पहाटेपासून लांबच लांब रांग राज्यभर दिसत आहे. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात सुध्दा लसीकरणासाठी रांगा लागल्या आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत लसीकरणाची वेळ आहे. आर्वीत सकाळी ७ वाजल्यापासून लसीकरणासाठी नागरिक रांगा लावताना पाहायला मिळत आहेत. टोकन पध्दतीने लसीकरण सुरु असले तरी एका लसीसाठी तब्बल चार पाच तास रांगेत उभे राहण्याची वेळ आर्वीकरांवर आली आहे.गुरूवारी नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जास्त वेळ लागू नये म्हणून टोकन पध्दतीने अर्धा किंवा एक तासाचे टाईम स्लॉट पाडून ३० किंवा ६० नागरिकांना येण्याची वेळ सांगून टोकन वितरित करावे अशी सूचना केली. यासाठी आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मोहन सुटे यांच्याशी चर्चा केली. टाईम स्लॉट नुसार टोकन वितरित केल्यास नागरिकांना जास्तीत जास्त ३० ते ६० मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला, अपंग आदींची गैरसोय होणार नाही. यावेळी सागर निर्मळ, सुनील बाजपाई, संजय थोरात आदी अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस