शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

भगवान बालाजीच्या रथोत्सव यात्रेत भाविकांची गर्दी

By admin | Updated: October 16, 2016 01:55 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली.

१५३ वर्षांची परंपरा : वायगाव नगरीत ‘हरि नारायणाचा’ गजरवायगाव (नि.) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली. टाळ मृंदगाच्या साथीने शुक्रवारी गावातून निघालेल्या रथयात्रेत सहभागी भाविकांच्या ‘हरि नारायण गोविंद’च्या जयघोषाने संपूर्ण वायगाव नगरी भक्तीमय झाली होती. रथयात्रा महोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी नवयात्रात आरती, पूजन, भजन आदी कार्यक्रमाची रेलचेल आहे. या रथयात्रेला १५३ वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. रथयात्रेनिमित्त गावात रात्रभर उत्साही वातावरण असते. रथयात्रा सुरू होण्यापूर्वी दहीहांडी, काला, प्रसाद वितरण पार पडले. श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सवात जिल्ह्यातील भाविकांची उपस्थिती होती. भाविकांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. या निमित्त रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रथाभोवती रोषणाई करूण हजारो भाविकांच्या साथीने यात्रा काढण्यात आली. उत्सव काळात कोणतीच अप्रीय घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळीचे ठाणेदार चंद्रकांत मदणे यांच्या मार्गदर्शनात देवळी, खरांगणा, पुलगाव व अल्लीपूर पोलीस ठाण्यातील चार अधिकारी, ४० पोलीस, १५ होमगार्ड बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आले. या कर्मचाऱ्यांसह वायगाव (नि.) पोलीस चौकीचे विनायक खकडे, गजानन राऊत, श्रावण ठाकरे, पवन बाभुळकर यांनी मंदिराच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. (वार्ताहर)