शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२४,८०० ग्राहकांची एकाच केंद्रावर गर्दी

By admin | Updated: March 15, 2015 01:54 IST

तालुक्यात असलेल्या ग्राहक संख्येच्या तुलनेत वीज बिल भरण्याकरिता केवळ एकच केंद्र असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अरुण फाळके कारंजा (घाडगे)तालुक्यात असलेल्या ग्राहक संख्येच्या तुलनेत वीज बिल भरण्याकरिता केवळ एकच केंद्र असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज बिल भरण्याकरिता आलेल्या नागरिकांना यात दिवस वाया घालावा लागतो. शहरात आणखी चार केंद्र उभारण्याची मागणी स्थानिक विभागाच्यावतीने वरिष्ठ कार्यालयाकडे केली असली तरी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.१०१ गावातील एक लाख २० हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात विद्युत ग्राहकांची संख्या २४ हजार ८०० आहे. या संपूर्ण विद्युत ग्राहकांना बील भरण्यासाठी तालुका स्थळी कारंजाला यावे लागते. हे एकमेव विद्युत संकलन केंद्र असल्यामुळे सर्वांना येथे येवून वीज बिल भरावे लागते. यात ग्राहकांचा संपूर्ण दिवस वाया जातो. ज्येष्ठ नागरिकांनाही तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. अनेक ग्राहकांना चक्कर येवून खाली पडल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. तालुक्यातील ग्राहकांनी आणखी किमान चार संकलन केंद्र मिळावे, यासाठी वीजवितरण कंपनीकडे मागणी केली. मात्र या मागणीकडे कंपनी दुर्लक्ष करीत असून ग्राहकांची फटफजिती होत आहे.कारंजा तालुक्यात ७ हजार ५०० कृषी पंप ग्राहक, १६ हजार ६५० घरगुती व वाणिज्य ग्राहक, ३३० औद्योगिक व वॉटर सप्लाय असे एकूण २४ हजार ८०० ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये वितरण कंपनी विद्युत बिलापोटी वसुली करते. दोन वर्षांपूर्वी ठाणेगाव, कन्नमवारग्राम, सारवाडी येथील सहकारी बँकात वीज देयक भरण्याची सुविधा होती. कारंजा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयातही वीजबिले स्वीकारली जायची. आता हे सर्व केंद्र बंद झाल्यामुळे नागरिकांना ४० कि़मी. लांबून ग्राहकांना बिल भरण्याकरिता कारंजाला येथे यावे लागत आहे. पूर्ण दिवस, श्रम व येण्याजाण्याचा पैसा वाया जातो. ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत उभे राहावे लागते. पाऊस, ऊन्ह, थंडीचा मारा सहन करावा लागतो.