शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

दव गेल्याने पिकांचे नुकसान

By admin | Updated: December 30, 2014 23:42 IST

आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने

साहूर : आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने ही स्थिती पालटण्याचे चिन्ह दिसत नाही. थंडीचा कडाका वाढल्याने दव कमी झाले आहे. यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवाव, तसेच आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.यावर्षींचा हंगाम सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी साडेसाती घेवुन आला होता. दीड महिना पाऊसच उशीरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उशीराने झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५० टक्के उत्पादन तेव्हाच घटले. त्यातही पाऊस अपुरा आल्याने व लवकरच निघुन गेल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनात पुन्हा घट झाली. यावर्षी पाऊसच कमी आल्याने विहिरींना पाणी कमी आहे. संकटाचा सामना करूनही उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी असतांना साहूर व परिसरात शीतलहर आल्याने दव गेले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीतील कापूस, तूर, मिरची व बागायची पीक धोक्यात आले आहे. पिकांचे रक्षण करून त्यांना वाढवतात. मात्र अस्मानी संकटामुळे हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. पिकांवरील रोगराई, मजूर, कृषी केंद्र संचालक व व्यापारी यांचा सामना करून शेतकरी पिचला आहे. यातही उरले सुरले पीक निसर्ग कोपून शेतकऱ्याला उध्दवस्त करतो. शेतकरी मरणासन्न अवस्थेत असून आर्थिक मदत देणे अनिवार्य झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाच वर्षापासून हुकमी व कमी खर्चाचे समजल्या जाणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगा देत आहे. यावर्षी कापसानेही दगा दिला आहे. दुष्काळाचे सावट पसरल्याने स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नापिकी व दवाच्या चक्रव्युहात सापडलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे. या भागातील पाहणी करून याचा अहवाल तयार करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)