शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परप्रांतीय मजुरांअभावी कापूस उद्योगांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

राज्यभरात जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस उतरविणे, गंजी लावणे यासह इतरही कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. याकरिता परप्रांतीय मजूर दरवर्षी हंगामात येतात. हंगाम संपल्यानंतर आपापल्या प्रांतात परत जातात. यावर्षीही जिनिंग फॅक्टरीमध्ये परप्रांतीय मजूर आले होते. त्यांच्या माध्यमातून सुरळीत कापसाची खरेदी सुरू होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच अर्धेअधिक मजूर आपापल्या प्रांतात निघून गेले.

ठळक मुद्देखरेदीला ब्रेक : शासनाच्या अस्पष्ट निर्देशामुळे जिनिंग-प्रेसिंग ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरिपाची चाहूल लागली असतानाही लॉकडाऊनमुळे ३० ते ४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. त्यामुळे तत्काळ खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे पण; जिनिंग-प्रेसिंगकडे सध्या मजुरांचा अभाव असल्याने आणि खरेदीबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. सद्यस्थितीत कापूस खरेदी सुरू करणे सहज सोपे नसल्याचे जिनिंग-प्रेसिंग संचालकांकडून बोलले जात आहे.राज्यभरात जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस उतरविणे, गंजी लावणे यासह इतरही कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. याकरिता परप्रांतीय मजूर दरवर्षी हंगामात येतात. हंगाम संपल्यानंतर आपापल्या प्रांतात परत जातात. यावर्षीही जिनिंग फॅक्टरीमध्ये परप्रांतीय मजूर आले होते. त्यांच्या माध्यमातून सुरळीत कापसाची खरेदी सुरू होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच अर्धेअधिक मजूर आपापल्या प्रांतात निघून गेले. आता लॉकडाऊनमुळे जिनिंग- प्रेसिंग बंद असल्याने जे मजूर राहिले आहे, ते येथेच अडकून पडले आहेत. त्यांना आता गावाला जाण्याचे वेध लागले असून ते कोणतेही काम करण्याच्या मानसिकतेत नाही. अशा परिस्थितीत जिनिंग फॅक्टरी सुरू केली तरी सूतगिरणी व कापड उद्योगाला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जिनिंगमालकांनी कापूस खरेदी करून त्याची रुई व गाठी कोणाला विकायच्या, हा मोठा प्रश्न आहे. आर्थिक मंदीमुळे कापसाच्या गाठींनाही भाव नाही. या हंगामात ३४ रुपये खंडीपर्यंत भाव खाली आले आहेत. म्हणजेच व्यापारीही शेतकऱ्यांकडून कमी भावात कापसाची खरेदी करणार. त्यानंतर व्यापाºयांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व धोका लक्षात घेता जिनिंगमालक कापूस खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेऊन शेतकरी आणि जिनिंगमालकांचे हित जोपासण्याची गरज आहे.जिनिंग संचालकांपुढे याही अडचणी कायमसंचारबंदीच्या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी गोळा होता येत नाही. असे असतानाही कापूस खरेदी सुरू केल्यास शेतकºयांची गर्दी वाढणार आहे. यासोबतच मजुरांचीही मोठे बळ लागणार आहे. त्यामुळे एका जिनिंग फॅक्टरीमध्ये दररोज केवळ २० ते २५ गाड्या घेता येईल. त्याची नोंदणी, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायझरची व्यवस्था, हात धुण्याची सोय, गाड्या खाली करताना घ्यावयाची काळजी, गाड्या खाली करणे, गंजी लावणे व कारखान्याच्या आत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांची व्यवस्था यासह संख्या याबाबत स्पष्टता असावी.कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापूर्वीच सर्व जिनिंग फॅक्टरीमध्ये आधीच कापूस, रूई, गाठी, सरकी यांचा प्रचंड साठा होता. लॉकडाऊनमध्ये ट्रान्सपोर्ट, वेअर हाऊस, लोडिंग-अनलोडिंग करणारे हमाल यांचेही काम ठप्प झाल्याने हा साठा गोदामात पाठविता आला नाही. परिणामी, जिनिंगमध्ये साठा कायम असल्याने नवीन साठ्याकरिता जागा नाही. येणारा कापूस ठेवायचा कुठे व प्रोसेसिंग झाल्यावर रुई व सरकीकरिताही जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जुन्या साठ्याची उचल झाल्याशिवाय जिनिंगमालक खरेदी सुरू करू शकणार नाहीत.

टॅग्स :cottonकापूस