शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चोरीच्या छडा लावण्यासाठी गुन्हेगारांची झाडाझडती

By admin | Updated: November 7, 2016 00:47 IST

आष्टी येथील गुरूदेव कॉलनीतील कवडकर यांच्या घरातून तोंडाला बांधून व काळे कपडे घालून असलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी दोन वृद्ध महिलांना

तिघांच्या घरांची घेतली झडतीवर्धा : आष्टी येथील गुरूदेव कॉलनीतील कवडकर यांच्या घरातून तोंडाला बांधून व काळे कपडे घालून असलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी दोन वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून घरातील रोख, सोन्या-चांदीचे दागिने असा २२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरीने पळविला होता. या प्रकरणात तीनही आरोपींना जेरबंद करण्यासाठी आष्टी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी रेकॉर्डवर असलेल्या तीन अट्टल चोरट्यांच्या घराची झडती घेतल्याचे सांगण्यात आले.मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास तीन चोरट्यांनी आष्टी येथील गुरूदेव कॉलनीतील कवडकर यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी ७० व ९० वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवित सोन्या-चांदीचे दागिणे, ८ हजार ५०० रुपये असा २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यावरून तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवित त्यांना जेरबंद करण्यासाठी आष्टी पोलिसांनी तपासाला वेग दिला. गुन्हा नोंदविण्यात आल्यापासून २४ तासांत आष्टी पोलिसांनी नोंद असलेल्या तीन अट्टल चोरट्यांच्या घराची झडती घेतली; पण सदर घटनेतील खऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात अद्यापही यश आले नसल्याचे सांगण्यात आले. लवकरच या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्यात यश येईल, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे राजू दहिलेकर करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)