शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

कॉपीराईट अ‍ॅक्ट अन्वये दोघांवर गुन्हा

By admin | Updated: March 24, 2017 01:48 IST

थ्री-एम कंपनीच्या नावावर नकली रिफ्लेटर विकत असल्याप्रकरणी मोटार हाऊस डिलर्स स्पेअर पार्ट, ठाकरे मार्केट समोर

वर्धा : थ्री-एम कंपनीच्या नावावर नकली रिफ्लेटर विकत असल्याप्रकरणी मोटार हाऊस डिलर्स स्पेअर पार्ट, ठाकरे मार्केट समोर वर्धा या दुकानाचे संचालक प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका व नकुल प्रमोद मुरारका यांच्याविरूद्ध कॉपीराईट अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. थ्री-एम कंपनीच्या नावावर नकली रिफ्लेक्टर विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींना मिळाली. यावरून इआयपीआर (इन्फोर्सर्स आॅफ इंटॅलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट्स) यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावरून गुरूवारी इआयपीआर पथकाचे गणेश संभाजी राणे रा. मुंबई यांनी गुरूवारी पोलिसांसह दाखल होत तपासणी केली. यात मुरारका यांच्या मोटर हाऊस डिलर्स स्पेअर पार्ट या दुकानात ९ बंडल नकली रिफ्लेक्टर आढळून आले. यातील प्रत्येक बंडलची किंमत ४ हजार ५०० रुपये असून पथक व पोलिसांनी ४० हजार ५०० रुपयांचे नऊ बंडल जप्त केले. नकली रिफ्लेक्टर विकून कॉपीराईटच्या स्वामित्वाचे, मूळ हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. याबाबत पथकातील गणेश राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ च्या कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पपीन रामटेके करीत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)