शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

By admin | Updated: October 26, 2016 00:56 IST

पिपरी (मेघे) येथील महानुभव पंथीय आश्रमात दत्तक दिलेल्या तपस्विनी ‘माधुरी’ हिने आत्महत्या केली.

तपस्विनी आत्महत्या प्रकरण : महिलांच्या आंदोलनानंतर चौकशीला वेगवर्धा : पिपरी (मेघे) येथील महानुभव पंथीय आश्रमात दत्तक दिलेल्या तपस्विनी ‘माधुरी’ हिने आत्महत्या केली. तीने आत्महत्या केली नसून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या भागातील महिलांनी केला होता. याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली तरी त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करीत या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यामुळेच की काय, आतापर्यंत चालढकर करणाऱ्या रामनगर पोलिसांनी या प्रकरणात मंगळवारी दुपारी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यात एका महिलेसह दोन पुरूषांचा समावेश आहे. यात शशिकला धुरमुसे, अक्षय नानाजी धुरमुसे व पंडीत डोमाजी चेके सर्व रा. पिपरी (मेघे) या तिघांवर भादंविच्या कलम ३०६, १७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल असलेल्यांपैकी एकालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. माधुरी गोमेराज आंबेकर (२४) असे मृतक युवतीचे नाव आहे. २९ सप्टेंबर रोजी ती घरी एकटी असताना तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणी तिच्या पालकांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. याचवेळी परिसरातील तिघांनी माधुरीला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता, असे असताना रामनगर पोलिसांकडून या प्रकरणाकडे चालढकल करण्यात आली. दरम्यान मृतक माधुरीच्या पालकांनी याची माहिती परिसरातील महिलांना दिली. या महिलांनी परिसरात चौकशी केली असता माधुरीला खरच मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी एकत्र येत या प्रकरणात मृतकाला न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात या महिलांनी एकत्र येत रामनगर पोलिसांना या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी प्रकरणाला २० दिवस लोटले तरी कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे पिपरी परिसरातील महिलांनी एकत्र येत सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची माहिती निवेदनातून दिली. महिलांनी निवेदन देताच त्यांच्याकडून मंगळवारी तक्रारीत नाव असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात रामनगर पोलिसांनी आरोपींना अटक करून शासन करावे, अशी मागणी या महिलांकडून करण्यात आली आहे.(प्रतिनिधी) घरात शिरून केली माधुरीला मारहाण माधुरी गोमेराज आंबेकर (२४) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती तीन वर्षांची असतानाच तिला महानुभाव पंथीय प्रचारक चंद्रकला यांनी दत्तक घेतले होते. चंद्रकला यांच्या निधनानंतर तिचा सांभाळ चंद्रकला यांची बहीण आशाबाई सुंदराबाई लासुरकर या करीत होत्या. आशाबाई २९ सप्टेंबरला धर्मप्रचारासाठी बाहेर पडल्या असता माधुरी घरी एकटीच होती. यावेळी परिसरातील काहींनी घरात शिरून तिला मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला; पण ती कशीबशी सुटली. तिला बेशुद्धावस्थेत सोडून मारेकऱ्यांनी पळ काढला. सायंकाळी ५ वाजता आशाबाई घरी आल्यावर घराचे दार आतून बंद होते. तेव्हा नागरिकांनी आशाबाईला हकिकत सांगितली. दार तोडल्यावर माधुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती.