शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:39 IST

नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही.

ठळक मुद्देन.पं. प्रशासनाची तक्रार : समस्या निवारणाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही. उलट मंगळवारी पाण्याची समस्या घेऊन नगर पंचायतीवर धडकलेल्या महिलांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत.नगर पंचायतीमध्ये आ. कुणावार यांची सत्ता असताना तीन वर्षांपासून पाण्याची समस्या सुटली नाही. पाण्याच्या समस्येकरिता केलेल्या आंदोलकांवर भादंविच्या कलम ३४१, ३४३, १८६ अन्वये तथा मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. मंदा रमेश ठावरे, निर्मला अनिल आलम, वच्छला सदाशिव कुमरे, कुसूम बावणे यांच्यासह २१ महिलांवर गुन्हे दाखल आहे. याबाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, नगराध्यक्ष शीला सोनारे यासह सर्व नगरसेवकांनी तक्रार केली. आंदोलक महिला दुपारी १२ वाजतापासून रात्री ११ वाजेपर्यंत चिमुकल्यांसह उपाशी पोलीस ठाण्यात ताटकळत होत्या.पाणी टंचाईसारख्या गंभीर प्रश्नाला महिलांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करून ठिय्या मांडला. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करणे म्हणजे सत्ताधाºयांच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये, समस्या मांडू नये, अशाच प्रकारे जनतेची मुसकदाबी करणे होय.- अशोक शिंदे, माजी आमदार, हिंगणघाट.