शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

९८० गावात उघड्यावर होतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:42 IST

गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे.

ठळक मुद्दे१७७ गावातून स्मशानभूमीच्या शेडची मागणी

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे. जिल्हा प्रशासनाकडे नोंद असलेल्या स्मशानभूमिपैकी १७७ गावांत उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार होत आहे.स्मशानभूमी विकासाच्या शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्याला या वर्षात स्मशानभूमी विकासाकरिता ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून स्मशानभूमिचा विकास साधण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. या निधीतून जिल्ह्यातील २०४ स्मशानभूमिचा विकास साधण्यात येत आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत; पण अनेक गावांत यातील एक छदामही पोहोचला नसल्याचे दिसून आले आहे.१३६१ गावांच्या या जिल्ह्यात होत असलेल्या कामांवरून आणि शासनाकडे असलेल्या नोंदीवरून केवळ ३८१ गावांत स्मशानभूमी असल्याचे दिसून आले आहे. यातील केवळ २०४ गावांतील स्मशानभूमिचे सौदर्यीकरण करण्यात येत आहे. याच गावांतील कामांवर आलेला निधी खर्च करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. इतर गावांत मात्र असा कुठलाही निधी देण्यात आला नसल्याचे दिसून आले आहे.ज्या गावातील व्यक्ती आहे, त्याच गावांत मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार व्हावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. गावातील व्यक्तीच्या या अपेक्षेनुसार शहरी असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी एक स्मशानभूमी असणे अनिवार्य झाले आहे. असे असताना जिल्ह्यात स्मशानभूमिची समस्या डोके वर काढत आहे. अनेक गावांत स्मशानभूमिच्या जमिनीवरून वाद झाल्याचे दिसून आले आहे. काही गावांत तर गावाची शिव ओलांडून दुसऱ्या गावात जाऊन तेथे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. यामुळे शासनाने प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमिची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही गावांमध्ये स्मशानभूमिच्या जागेवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. गावांत निर्माण होणारे हे तंटे सोडविण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.अनेक गावात जमिनीची समस्यागाव तेथे स्मशानभूमी संकल्पनेला जागेचे ग्रहण लागल्याचे दिसून आले आहे. पूर्वी काही दानशूर व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेतून स्मशानभूमिकरिता मोठ्या जमिनी दान दिल्या आहेत. तत्सम पत्रही ग्रामपंचायतीला दिले आहे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. गावांची लोकसंख्या वाढत आहे. यामुळे गावांत स्मशानभूमी गरजेची असताना आता याकरिता कुणी जमिनी देण्याकरिता तयार नाहीत. शिवाय अशा भागातील ग्रामपंचायतीही याकरिता पुढाकार घेत नसल्याने बहुतांश गावांत जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.स्मशानभूमीला रस्त्यासह इतर सुविधाही पुरविण्याच्या सूचनास्मशानभूमी विकासाकरिता वर्धा जिल्ह्याला सुमारे सहा कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता, शेड, पाण्याची व्यवस्था, येणाऱ्या व्यक्तींकरिता बसण्याची व्यवस्था आदी कामे करावयाची आहेत. या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०४ गावांत कामे सुरू असल्याची माहिती आहे.एका स्मशानभूमिकरिता पूर्वी १० लाख रुपये देण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. यात आता बदल करण्यात आला असून हा निधी वाढवून २० लाख रुपये करण्यात आला आहे. या निधीतून प्रत्येक गावातील स्मशानभूमीचे सौदर्यीकरण होणे अपेक्षित आहे.