पंतप्रधानांना पाठविले पत्रहिंंगणघाट : गत अनेक वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी प्रलंबीत आहे. आजवर वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. तेलंगणा राज्य निर्माण झाले तर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीलाच विरोध का, असा प्रश्न निर्माण होतो. वेगळ्या विदर्भाबाबत केंद्र सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन राज्याचा दर्जा प्रदान करावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान क्रांतीच्यावतीने पत्रातून केली आहे.या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी किसान क्रांतीचे विदर्भ अध्यक्ष संतोष तिमांडे, अखिल भारतीय किसान क्रांती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री दुब्बावार यांची उपस्थिती होती. येथील सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम नाही. वैदर्भीय तरूण हा नैराश्याच्या गर्तेत जीवन जगतो आहे. संंयुक्त महाराष्ट्रात विदर्भाच्या वाटयाला केवळ मागासलेपणा आला आहे. शेतकरी आत्महत्या, सिंचनाच्या समस्या, लघु व कुटीर उद्योगांच्या समस्या, सुशिक्षित बेकारी, उद्योगांची दैनावस्था यामुळे आजपर्यंत विदर्भाची मोठ्या प्रमाणावर गळचेपी झाली असल्याचे पत्रात नमुद केले आहे. ही बाब विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणारी असून याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करु नये, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाची प्रत केंद्रीय गृह मंत्री राजनाथसिंग यांना देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा
By admin | Updated: December 19, 2015 02:13 IST