शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:18 IST

विश्वाचे स्वरूप, ग्रह, तारे, नक्षत्र राशी आदींबाबत अजूनपर्यंत आपण सज्ञान झालो नाही. यामुळे जीवनात घडणाºया बºया-वाईट घटनांचा संबंध आकाशातील ग्रहताºयांशी जोडतो व आर्थिक, शारीरिक, मानसिक फसगत करून घेतो.

ठळक मुद्देहेमंत धानोरकर : अनेकांत स्वाध्याय मंदिरात नरेंद्र दाभोळकरांची ७१ वी जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विश्वाचे स्वरूप, ग्रह, तारे, नक्षत्र राशी आदींबाबत अजूनपर्यंत आपण सज्ञान झालो नाही. यामुळे जीवनात घडणाºया बºया-वाईट घटनांचा संबंध आकाशातील ग्रहताºयांशी जोडतो व आर्थिक, शारीरिक, मानसिक फसगत करून घेतो. येणाºया पिढीला चिकित्सक आणि वैज्ञानिक बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये पालकांनी शिक्षकांनी, खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते तथा खगोल अभ्यासक हेमंत धानोरकर अंबेजोगाई यांनी व्यक्त केले.अनेकांत स्वाध्याय मंदिरात शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त विवेक जागर दिनी आयोजित ‘ग्रहगोल, तारे; समज गैरसमज, खगोलशास्त्र, ज्योतिष्यशास्त्र संबंध’ या विषयावरील पीपीटीद्वारे व्याख्यानात ते बोलत होते. मंचावर महा. अंनिसचे तालुकाध्यक्ष अरुण चवडे, डॉ. सिद्धार्थ बुटले, स्वावलंबीचे मुख्याध्यापक मनोज मोहता, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार उपस्थित होते. धानोरकर यांनी विश्वाचे स्वरूप याबाबत माहिती देताना पृथ्वीपासून जस-जसे दूर जाऊ, तस-तसे मानवाचे अस्तित्व संपुष्टात येते; पण माणूस आपल्याच अहंकारात वावरतो. हे बदलणे गरजेचे आहे. पोपला ४०० वर्षानंतर जे कळले ते भारतीयांना अजून कळले नाही, असा टोला मारताना विद्यार्थ्यांनी इतर भेटवस्तू न घेता टेलिस्कोप वा दूर्बिनीसाठी आपल्या पालकांकडे आग्रह धरावा, असेही सांगितले. यावेळी त्यांनी ग्रह, तारे, नक्षत्र, राशी आदींचा कोणताही परिणाम मानवी जीवनावर होत नसून आपल्या अज्ञानापोटी ज्योतिषांचा धंदा जोरात चालतो. त्यामुळे आपण चिकित्सक होणे गरजेचे आहे. खगोलशास्त्र हा विषय वैज्ञानिक दृष्टीकोन देणारा आहे; पण त्याला ज्योतिष्यशास्त्राशी जोडून वैज्ञानिक दृष्टीकोन नष्ट केला जात आहे. याबाबत सावध होऊन विवेकी बनण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी दुर्बिनीच्या साह्याने त्यांनी चंद्रावरील खड्डे उपस्थितांना दाखविलेत.भरत कोकावार यांनी अभिवादन गीत सादर केले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी केले तर परिचय सुनील ढाले यांनी करून दिला. संचालन कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार सारिता डेहनकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनिल मुर्डीव, राजेंद्र ढोबळे, पंकज इंगोले, प्रकाश जिंदे, सुनील सावध, प्रा. नूतन माळवी, अ‍ॅड. पूजा जाधव, धनंजय नाखले आदींनी सहकार्य केले.

मानवी जीवनाशी ग्रहगोलांचा संबंध जोडणे चुकीचेचमानव जसा पृथ्वीपासून दूर जातो, तसे त्याचे अस्तित्व नष्ट होते; पण मानवाचा अहंकार सुटत नाही. ग्रह, तारे, राशी आदींचा मानवी जीवनावर कधीही परिणाम होत नाही; पण खगोलशास्त्राला जोतिष्यशास्त्राशी जोडून वैज्ञानिक दृष्टीकोण नष्ट केला जात आहे. ग्रहगोलांचा संबंध मानवी जीवनाशी जोडणे चुकीचेच आहे.