शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम विकासासाठी कोअर टिम तयार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सह्याद्री अतिथीगृहात पार पडली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेवाग्राम आश्रमाचे शेख हुसैन, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या २ आॅक्टोबर २०१९ रोजीच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित १५० कार्यक्रमांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. महात्मा गांधीजी सेवाग्राम मध्ये १०३० ते १९४८ या प्रदीर्घ कालावधीसाठी वास्तव्यास होते. या आश्रमात त्यांनी अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. त्याच्या १५० व्या जयंती निमित्ताने त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्रामचा विकास व्हावा, महात्मा गांधीजींच्या विचारांचे पाईक असलेल्या जगभरातील त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शनाचे एक उत्कृष्ट केंद्र या माध्यमातून विकसित व्हावे, यादृष्टीने सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात आणखी कोणत्या नावीन्यपूर्ण योजना किंवा उपक्रम राबविता येतील याचा विचार केला जावा, यात लोकांची मते मागविण्यात यावीत, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.मंजूर आराखड्यापैकी मार्च २०१८ पर्यंत ८५.१२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर सन २०१८-१९ या वर्षात २६.०८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या आराखड्यात अनेक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहे.यामध्ये सेवाग्राम परिसरामध्ये अंगुरीबागेजवळ १००० व्यक्तींसाठी सभागृह, अभ्यासकेंद्र, सुसज्ज ग्रंथालय, यात्री निवास परिसरात निवासी कॉटेजचे बांधकाम, यात्री निवास येथे ४ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, कस्तुरबा चौक ते आश्रम या रस्त्याची सुधारणा, कंपाऊंड वॉल, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे, माहिती केंद्र, बुटी बोरी जंक्शन ते वर्धा व सेवाग्राम या मार्गावर वृक्ष लागवड, सेवाग्राम, वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास, हेरिटेल ट्रेलची उभारणी, पवनार येथील दिल्ली गेट आणि परिसराचे संवर्धन अशा विविध कामांचा यात समावेश असल्याचे याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार