शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पावधित सिमेंट रस्त्याला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:49 IST

येथील आसोले नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला तडा गेल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होताना दिसते.

ठळक मुद्देउलट-सुलट चर्चेला उधाण : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील आसोले नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला तडा गेल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होताना दिसते. सदर प्रकरणी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून आर्वी-तळेगाव मार्गावरील आसोलेनगर परिसराची ओळख आहे. या परिसरात काही ठिकाणी सिमेंट रस्ते व पक्क्या नाल्या असल्या तरी बहूतांश ठिकाणी पक्क्या नाल्या व सिमेंट रस्ते नसल्याने तेथील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना ये-जा करताना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे रहिवासी सांगतात.आसोलेनगर येथील रहिवाशांची समस्या लक्षात घेता सुमारे दीड वर्षांपूर्वी मुख्य मार्गावरून आसोलेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. या कामासाठी मोठ्या प्रमाणात शासनाचा निधीही खर्च करण्यात आला. मात्र, अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी तडा गेल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर सिमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते; पण अल्पावधीतच रस्त्याला तडा गेल्याने गुणवत्तापूर्ण काम करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कंत्राटदार यांच्यात काही अर्थपूर्ण व्यवहार तर झाले नाही ना, अशी चर्चाही परिसरात ठिकठिकाणी होताना दिसते.सदर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.