शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘कोविड व्हॅक्सिनेशन’मध्ये मध्यमवयीनांनी ज्येष्ठांना सोडले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 22:09 IST

शुक्रवारी ४५ ते ६० वयोगटातील मध्यमवयीनांनी ६० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मागे सोडले आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३ हजार ४०१ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १७ हजार ३४७ लाभार्थींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील १ लाख ३ हजार ९३७ व्यक्तींनी लसीचा पहिला तर २५ हजार ६७९ लाभार्थींनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याने ओलांडला २.४३ लाखांचा उंबरठा : येत्या काही दिवसांत मोहिमेला मिळेल गती

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेने शुक्रवारी २.४३ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ६११ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिनचा पहिला तर ६१ हजार ८५७ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.विशेष म्हणजे शुक्रवारी ४५ ते ६० वयोगटातील मध्यमवयीनांनी ६० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मागे सोडले आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३ हजार ४०१ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १७ हजार ३४७ लाभार्थींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील १ लाख ३ हजार ९३७ व्यक्तींनी लसीचा पहिला तर २५ हजार ६७९ लाभार्थींनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४५३ फ्रंटलाइन वर्कसनी कोविड व्हॅक्सिनचा पहिला तर केवळ ५ हजार ७९० लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. एकूणच फ्रंटलाइन वर्कर्स लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत उदासीन असल्याचे बघावयास मिळत आहे. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्समध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

विदेशात जाणाऱ्यांना दिली जातेय कोविशिल्ड- जिल्ह्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविडच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देणे बंद असले तरी त्याला विदेशात जाणारे हे अपवाद ठरत आहे. शिक्षणासह नोकरीसाठी विदेशात जात असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. त्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या शिफारशीअंती आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील सात व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

१,५४४ तरुणांनी घेतला लसीचा दुसरा डोस- शासनाच्या सूचनेनुसार मध्यंतरी जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना कोविडच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला; पण नंतर लस तुटवड्यामुळे या वयोगटातील व्यक्तींना लसीचा पहिला डोस देणे बंद केले, तर सध्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या व मुदत संपत असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीचा दुसरा डोस दिल्या जात आहे. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल १ हजार ५४४ व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या