शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस भावावर मंदीचे सावट; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:28 IST

गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.

ठळक मुद्देपाच हजार चारशे रूपयावर दर स्थिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.अपुरा पाऊस व बोंडअळी या कारणामुळे आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही. याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर झाला तर तालुक्यातील बहुतांश: शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या धास्तीने कपाशी पीके उपटून चना व गहू पेरणे पसंत केले. यामुळे यावर्षीचा कापूस हंगाम तोट्याचा ठरून जानेवारी महिन्यातच कापसाची उलगंवाडी होणार असल्याचे चित्र आहे. तर कोरडवाहू कपाशी उत्पादकांना यावर्षी मोठा फटका सहन करावा लागला असल्याचे चित्र आहे. आधीच कापसाचे उत्पादन कमी, त्यावर मजूराचा होणारा खर्च अधिक असूनही गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून सध्या हा भाव पाच हजार चारशेवर गेल्या एक आठवड्यापासून स्थिरावला आहे. कापसाच्या भावाची होणारी घसरण ही शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे.आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे. यात कापूस पिकावा का नाही? या फेºयात सध्या शेतकरी सापडला आहे. सध्या तरी हे कापसाच्या भावाच्या मंदीचे सावट कायम राहणार असल्याचे चित्र आहे. नापिकी व कमी पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम आर्थिक फटका देणारे ठरले आहे. बोंडअळी व पावसाचा मोठा ताण हे दोन घटक कापूस उत्पादक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मारक ठरले आहे. त्यात एकरी चार ते पाच क्विंटलचा फटका बसल्याचे कापसाचे उत्पादन अर्ध्यावरं आहे. गेल्या तीन वर्षापासून नापिकी व नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाची कापसाची स्थिती पाहता दीडपट भाव कधी देणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.कापूस शेतकऱ्यांच्या घरातचयावर्षी कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या भागात एकरी ८ क्ंिक्टल उत्पादन झाले. कापसाचे भाव वाढतील अशी आशा असतांना भाव ५४०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. भाव सहा हजारांवर जाईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस बाजारात विकण्यासाठी आणलेला नाही. कापूस घरीच भरून ठेवला आहे. जानेवारीपर्यंत शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहणार आहे असे चित्र दिसून येत आहे. कापूस बाजारातही आवक मंदावलेली असल्याचे दिसते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकीचे भाव पडल्याने कापसाच्या भावात मंदी आली आहे. अजून काही दिवस हीच परिस्थिती कामय राहणार आहे.- मोन्टू चांडक, कापूस व्यापारी, आर्वी.