शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्यातील कापूस जातोय आर्वीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 04:00 IST

महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिकारी यांच्याकडे वळविण्यात व्यापाऱ्यांना यश आले. इतर ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली.

ठळक मुद्देकापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची भटकंती : कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : कापसाची उलंगवाडी झाली आणि कापूस विक्रीस नेण्याच्या बेतात शेतकरी असताना कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. सेलू येथील बाजारपेठेत कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने आता कापूस विक्रीसाठी भटकंती करत बाजारपेठ शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिकारी यांच्याकडे वळविण्यात व्यापाऱ्यांना यश आले. इतर ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली.त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे घरात असलेला कापूस विक्री करणे, हा एकमेव पर्याय आहे. आता शेतकºयांनी घरात असलेला कापूस गाड्या भरून तालुक्यातील बाजारपेठेत नाही तर दुसऱ्या बाजारपेठेत का होईना म्हणून विक्रीस काढला आहे.सेलू तालुक्यातील कापूस पाच वर्षांपूर्वी आर्वीच्या दिशेने जात होता. बाजार समितीने हा कापूस सेलू बाजारपेठेतच विकला जावा म्हणून उपाययोजना केल्या होत्या.आता पुन्हा शेतकऱ्याला जवळचे सोडून दूरच्याचा हात पकडण्याची वेळ आली आहे. शासनाची कापूस खरेदी बंद आहे. अशातच व्यापाºयांनी हात वर केले आहे. तालुक्यातील जवळपास ८०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.सेलूची बाजारपेठ सुरू करासेलू ही कापसाची मोठी बाजारपेठ आहे. लांब धाग्याचा कापूस पिकविणाऱ्या तालुक्यात सेलूचा समावेश होतो. येथील कापूस खरेदी बंद राहावी, या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बाजार समितीचा बुडतोय सेससेलू तालुक्याला लागूनच आर्वी तालुका आहे. येथे कापूस खरेदी केंद्रे सुरू झाली. त्यामुळे खरांगणा ते आर्वी येथे असलेल्या जिनिंगमध्ये या परिसरातील कापूस आता विक्रीला जाताना दिसत आहे. यामुळे सेलू बाजार समितीला मिळणाऱ्या सेसला मुकावे लागणार आहे.शेतकरी संघटनेचे आगळेवेगळे कापूस कैफीयत आंदोलनचिकणी (जामणी) : २० एप्रिल पासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली; मात्र एका दिवशी २० गाड्या घेतल्या जात आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण झाले. सीसीआय केवळ एफएक्यू ग्रेडचा कापूस घेत आहे. नॉन एफएक्यू कापूस घेत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने शेतकऱ्यांचा पूर्णच कापूस घ्यावा, याकरीता शेतकरी संघटना ३० एप्रिलला आगळेवेगळे कापूस कैफीयत आंदोलन करीत असल्याची माहिती शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्याध्यक्ष सतीश दाणी यांनी लोकमतला दिली. आंदोलन प्रत्येकाने आपापल्या घरूनच करायचे असून यामध्ये केवळ संबंधित प्रतिनिधींना मेसेज अथवा संपर्क करावा, असे ते म्हणाले.

टॅग्स :cottonकापूस