देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन अन् लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून सर्वच केंद्रावरील सीसीआयची कापूस खरेदी ठप्प पडली होती. यामुळे खरिप हंगामाच्या तोंडवर शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मंगळवारपासून पुलगाव येथील केंद्रावर सीसीआय अंतर्गत महाकॉटची कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.सीसीआयच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना हमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सर्व कापूस खरेदी केंद्र लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांकडे ३० ते ४० कापूस शिल्लक राहिला. दीड महिन्यानंतर खरीप हंगाम सुरु असल्याने त्याच्या तयारीकरिता शेतकऱ्यांना पैशीची गरज आहे. कापसाच्या विक्रीअभावी शेतकऱ्यांच्या हातातही पैसा नव्हता. त्यामुळे लवकरात लवकर कापूस खरेदी सुरु व्हावी, याची प्रतीक्षा होती. मंगळवारी पुलगाव येथील संत गजानन माऊली या केंद्रावर कापसाची खरेदी सुरु केली आहे.उन्हाळा वाढत असल्याने कापसाच्या वजनात घट होत आहे. आणखी काही काळ खरेदी बंद असती तर शेतकºयांना मोठा फटका बसला असता पण, आता खरेदी सुरु केल्याने दिलासा मिळाला आहे.केंद्रावर अशी घेतली जाते खबरदारीकोरोनाचे संकट कायम असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खरेदी केंद्रावर खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची नोंदणी केली असून नोंदणीप्रमाणे आदल्या दिवशी फोन करुन दुसऱ्या दिवशी गाड्या बोलावल्या जात आहे. गर्दी टाळण्यासाठी दररोज वीस गाड्या बोलाविल्या जात असून एक गाडी आत गेल्यावर गाडीसह वाहन चालक व सहकाऱ्याचे सॅनिटायझेशन करतात. त्यानंतर वजन केल्यानंतर कापूस खाली करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध लावण्यासोबतच शेतकºयांचेही समाधान होत आहे.बाजार समिती ठरलीय दुवाकापूस खरेदी केंद्रावर गर्दी होवू नये म्हणून पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये नोंद केलेल्या शेतकऱ्यांना क्रमाक्रमाने बोलावित आहे. त्यानंतर बाजार समितीतून टोकण दिल्यानंतर अग्रक्रमाने सीसीआयच्या संबंधीत कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागतो. कापूस उत्पादक शेतकरी व खरेदीधारक सीसीआय या दोघांमधील दुवा म्हणून बाजार समिती कार्य करीत आहे. त्यामुळे खरेदी केद्रावरील शेतकऱ्यांची गर्दीही कमी झाल्याचे दिसून येत आहे.लॉकडाऊननंतरच्या महिनाभरानंतर मंगळवारपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरु झाली आहे. प्रथम शेतकऱ्यांची नोंदणी केल्यानंतरच नोंदणीनुसार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात आहे. जुन्या नोंदणीधारक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यानंतरच नवीन नोंदणी सुरु केली जाईल.मनोहर खडसे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.
सीसीआयकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ने कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST
देवकांत चिचाटे। लोकमत न्यूज नेटवर्क नाचणगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन अन् लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून सर्वच केंद्रावरील सीसीआयची कापूस खरेदी ठप्प पडली ...
सीसीआयकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ने कापसाची खरेदी
ठळक मुद्देमंगळवारपासून प्रारंभ : दररोज घेणार २० गाड्या, शेतकऱ्यांना दिलासा