शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या भावात ३०० रुपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:21 IST

गेल्या पंधरवड्यापासून कापसाच्या भावात ३०० रुपयांची प्रति क्विंटल घट झाल्याने शेतकऱ्याने आपला माल बाजारात विकण्यासाठी आणणे कमी केल्याने पर्यायाने जिनिंगवर याचा परिणाम दिसून येत आहे.

ठळक मुद्देकापसाची नोंद नाही : थेट खरेदीमुळे आवक मंदावली

सुरेंद्र डाफ ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या पंधरवड्यापासून कापसाच्या भावात ३०० रुपयांची प्रति क्विंटल घट झाल्याने शेतकऱ्याने आपला माल बाजारात विकण्यासाठी आणणे कमी केल्याने पर्यायाने जिनिंगवर याचा परिणाम दिसून येत आहे.गेल्या पंधरवाड्यापासून आर्वी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात धामणगाव, देवगांव, यवतमाळ, कुºहा, तिवसा व इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होती. परंतू गेल्या काही दिवसात कापसाच्या भावात प्रति क्विंटल ३०० रुपयांची घट झाल्याने येत्या पंधरवाड्यात कापसाचे भाव पाडण्याचे कुठलेही संकेत बाजारपेठेत दिसत नसल्याने शेतकºयानी आपला कापूस माल घरात ठेवणे पसंत केले आहे.यावर्षी कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे यातही कापसाला चांगले भाव मिळण्याचे संकेत आहे. शेतकऱ्यांना मिळाल्याने कापूस निघाल्यानंतर शेतकºयांना ५ हजार ९०० रुपये पर्यंत भाव कापसाला प्रति क्विंटल भाव मिळाला परतु गेल्या १० दिवसांपासून या कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी सध्या बाजारपेठेत कापसाची आवक मंदावल्याचे चित्र आहे.यातही आर्वीत थेट कापूस खरेदीदाराकडून कापसाची मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी सुरू असून यात बाजार समितीचा मापारी नसल्याने व या खासगी व थेट कापूस खरेदी परवानाधारकांडून होणाºया कापूस खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण नसल्याने या थेट खरेदीत कुठल्या व्यापाऱ्याने किती क्विंटल कापूस खरेदी केला याचा ताळमेळ बाजार समितीला नाही याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांकडे असल्याने त्यांनी या थेट परवानाधारकांडून होणाऱ्या खरेदीची आवकची नोंद घेण्याची मागणी शेतकऱ्यांत आहे. यात कुठला व्यापारी किती कापूस खरेदी करतो. याची नोंद नाही हे थेट कापूस खरेदीधारक बाजार समितीच्या अंतर्गत घेण्याची व प्रत्येक खासगी थेट कापूस खरेदी केंद्रावर बाजार समितीची काटापट्टी शेतकऱ्यांना द्यावी व बाजार समितीचा मापारी या कापूस खरेदीच्या ठिकाणी नियुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळली जाईल. आर्वीत थेट कापूस खरेदीचे सहा व्यापाऱ्यांकडे लायसन्स आहे.परवाना पणन महासंघ पुणे यांच्याकडे राहतो व याचे नियंत्रण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे असते. परंतु या थेट कापूस खरेदीत शासनाने अनुदान घोषित केल्यास बाजार समितीची काटापट्टी आवश्यक आहे.सध्या आर्वीत पणन महासंघाचे थेट परवानाधारक सहा जण आहे. यात किती कापसाची खरेदी झाली याची माहिती बाजार समितीला नाही. त्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांकडे असल्याने त्यांना त्यांच्या कापूस खरेदीची नोंद घ्या व बाजार समितीला विश्वासात घ्यावे.विनोद कोटेवार, सचिव, कृ.उ.बा.स. आर्वी.

टॅग्स :cottonकापूस