शेतकऱ्यांना दिलासा : वर्धा बाजार समितीमध्येही दरवाढवर्धा : अत्यल्प हमीभावामुळे कापूस हे पीक परवडेनासे झाले होते; पण गत चार दिवसांपासून कापसाची दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. देवळी, हिंगणघाटनंतर आता वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही कापसाला ४६५० रुपये भाव मिळाला आहे.देवळी येथे कापसाला ४७५१ रुपये, हिंगणघाट येथे ४७४० रुपये तर वर्धा बाजार समितीत बुधवारी ४६५० रुपये भावाने कापसाची खरेदी करण्यात आली. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत खरेदीदार आंजी आशिष अग्रवाल यांनी बुधवारी शेतकऱ्याला अधिक भाव देत कापूस खरेदी केला. वर्धा बाजार समितीत या हंगामातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव ठरला. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीच्या मार्केट यार्डवरच आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शरद देशमुख, उपसभापती पांडुरंग देशमुख, सचिव पेंडके, सहायक सचिव बोकाडे व संचालकांनी केले. येथे होणाऱ्या लिलावामुळे शेतमालाला अधिकाधिक भाव मिळू शकेल. कापसाच्या भावात दररोज चढ-उतार होत असल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
कापसाचे दर ४६५० रुपये
By admin | Updated: December 24, 2015 02:43 IST