शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

सेवाग्राम आश्रमात कापूस ते कापड उपक्रम

By admin | Updated: February 6, 2017 01:01 IST

महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सूतकताई होत होती; मात्र त्यापासून कापड निर्माण करण्याकरिता ते सूत बाहेर पाठवावे लागत होते.

बापूकुटीत आतापर्यंत होत होती सूतकताई दिलीप चव्हाण   सेवाग्राम महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सूतकताई होत होती; मात्र त्यापासून कापड निर्माण करण्याकरिता ते सूत बाहेर पाठवावे लागत होते. आता तसे होणार नाही. महात्मा गांधी यांचा मुख्य उद्देश येथे आता साध्य होणार आहे. आश्रमात सूतकताईसह विणाईच्या कार्याचा प्रारंभ होणार आहे. तसे एक युनिट आश्रमात निर्माण करण्यात आले आहे. येथे लवकरच कापूस ते कपडा हा उपक्रम सुरू होणार आहे. सेवाग्राम आश्रमात येणारा कार्यकर्ता नित्यनियमाप्रमाणे सूतकताई करतो. शिवाय येथे गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त अखंड सूत्रयज्ञ सुरू असतो. आश्रमातील महादेवभाई कुटीमध्ये अंबर चरख्याचे युनिट सुरू करण्यात आलेले आहे. येथे सहा ते आठ बॉबीनचे अंबर चरखे असून ते गावातीलच स्त्री व पुरुष चालवायला येतात. यामुळे रोजगाराची हमी व संधी मिळाली. तसेच आदिनिवासमध्ये दोन व सहा बॉबीनचा चरखा मार्गदर्शिका चालवितात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सूत निर्माण होते. एवढे सूत येथे तयार होत असताना त्यापासून कापड निर्मिती करीता कुणीही पुढाकार घेतला नाही. येथे तयार होणारं सूत नालवाडी येथे विणाईसाठी पाठवून कपडा तयार करण्यात येत होता. याचा उपयोग विक्री तसेच आश्रमात राहणाऱ्यांकरिता उपयोगात आणल्या जाण्याची पध्दती होती. आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर व मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी गांधीजींच्या ग्रामोद्यागातील कार्य आश्रमात व्हावे यासाठी सूत कताई आणि विणाईसाठी धडपड सुरू केली. त्यांच्या धडपडीला यश आले. विणाईसाठी आवश्यक करघा आणि अन्य यंत्राची निर्मिती येथे करण्यात आली आहे. या कामाकरिता बॉबीन्स भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाकरिता सेलू येथील अनुभवी रमेश पवनारकर व रामभाऊ बोकडे या दोन व्यक्तींची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली. दोघेही संगीता बारई व सविता ढोबळे या दोन महिलांना या कामाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विणाईच्या कामाकरिता दोनशे बॉबीन्स भरणे आवध्यक आहे. या दोनशे बॉबीन्स भरल्यानंतर दोन हजार मिटरचा ताना बनतो. यानंतरच त्या बॉबीन्स करघ्यावर लावून विणाईचे काम सुरू केल्या जाते. आश्रमातच सूतकताई ते विणाई असे काम होत असल्याने गांधीजींच्या कार्याची आणि अर्थशास्त्राला जवळून पाहण्याची व ती समजून घेण्याची संधी पर्यटक व दर्शनार्थींना मिळणार आहे. हिच खरी उपलब्धी बापूंच्या ग्रामीण अर्थशास्त्राला रुजविण्याची ठरणारी असल्याच्या प्रतीक्रिया आश्रमातून मिळत आहेत. या उपक्रमाच्या प्रारंभाकडे अनेकांचे लक्ष आहे.