वर्धा : ग्रामीण भाग पक्क्या रस्त्यांनी जोडला जावा, दळण वळण सोईचे व्हावे म्हणून पंतप्रधान ग्राम सडक योजना अंमलात आली. यात गावखेड्यापर्यंत रस्ते पोहोचले; मात्र त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. या भ्रष्ट्राचावर कोणीही कारवाई करण्यास तयार नसल्याचे म्हणत खासदार रामदास तडस यांनी सोमवारी लोकसभेत शुन्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली. लोकसभा शुन्यकालमध्ये वर्धा, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी प्रधाणमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत होणाऱ्या सडकेबाबत गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्ट्राचार झालेला आहे. त्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. तसेच त्यासंदर्भात संबंधीत विभागाला सांगितले आहे. जेव्हा रस्त्याचे जेव्हा इस्टीमेट बनतात तेव्हा त्यामध्ये पाच वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरूस्ती ठेकेदाराकडे असतात आणि त्यांचे देखभाल दुरूस्ती पाच वर्षापर्यंत करने त्यांना अनिवार्य आहे. परंतु वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये देखभाल दुरूस्तीचे कंत्राट पुन्हा काढण्यात आले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)
लोकसभेत शून्य प्रहरात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार
By admin | Updated: March 18, 2015 01:57 IST