दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्रामभ्रष्टाचार मुक्त भारत ही कल्पना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. प्रत्येक विभागातच भ्रष्टाचार बोकाळला असून यातून तुरुंगसुद्धा सुटलेले नाही. कीड ज्याप्रमाणे पिकांचा सर्वनाश करते त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आहे. याकरिता जनजागृती करण्याकरिता काढण्यात आलेली सायकल रॅली बापूकुटीत पोहोचली. येथे प्रार्थना करून भ्रष्टाचार मुक्त तुरुंग आणि खेळांच्या विकासांची संकल्पना मांडत असलेली ही रॅली पुढचा प्रवास करेल, असे सायकल यात्रा प्रमुख उपतुरुंग अधीक्षक एम.संपथ यांनी ‘लोकमत’ला दिली. हैद्राबाद येथील चारमिनार परिसरातून भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीकरिता सायकल यात्रेवर निघालेले १२ सायकलस्वार रविवारी सायंकाळला सेवाग्राम येथे पोहोचले. ही यात्रा ३० सप्टेंबर २०१५ रोजी निघाली. सेवाग्राम येथे त्यांचा प्रवास ५१० कि़मी.च्या झाला असून यात्रेला पाच दिवस झाले. सोमवारी सकाळी सर्व सायकलस्वारांनी महात्मा गांधी स्मारकांची माहिती घेतली.यावेळी एम. संपत म्हणाले, दिवसाला १०० कि़मी.चा प्रवास आम्ही करीत आहोत. ठिकठिकानच्या शाळा आणि लोकांना भेटून आम्ही आमचा उद्देश सांगत असून आतापर्यंत सर्वत्र चांगले सहकार्य मिळाले आहे. लोकांमध्ये खेळ, उत्तम आरोग्य या बाबी रूजल्या तर नक्कीच भ्रष्टाचाराकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलेल. आम्ही सर्व तुरुंग विभागाशी संबंधित आहोत. यात एस. निवास रेड्डी तुरुंगाधिकारी आहेत. आर. राजेंद्र व इ. नागराजू उप तुरुंगाधिकारी आहेत. अन्य सर्व वॉर्डन आहे. नागपूर, पांडूर्णा, बैतूल असा प्रवासकरिता १७ आॅक्टोबर २०१५ रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंग इंडिया गेट येथे या यात्रेचा समारोप होईल. यात्रेचा पूर्ण प्रवास १८०० कि़मी. होणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असल्याचे एम. संपथ व सहकाऱ्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आश्रमचे हिरा शर्मा, बाबा खैरकर, सिद्धेश्वर उंबरकर, अशोक गिरी, प्रशांत ताकसांडे, आकाश लोखंडे, प्रसाद, संगीता चव्हाण, जयश्री पाटील, नथ्थू थुल इत्यादी उपस्थित होते. 8दिवसाला १०० कि़मी.चा प्रवास आम्ही करीत आहोत. हा पूर्ण प्रवास १८०० कि़मी. होणार आहे. नागपूर, पांढुर्णा, बैतूल असा प्रवास करीत १७ आॅक्टोबर २०१५ रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंग इंडिया गेट या ठिकाणी या यात्रेचा समारोप होईल.8देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. या प्रवासात सर्वांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या आश्रमातून एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचेही ते म्हणाले.
हैदराबाद येथील ‘भ्रष्टाचार मुक्त भारत सायकल यात्रा’ बापू कुटीत
By admin | Updated: October 6, 2015 02:47 IST