शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट येथे अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार

By admin | Updated: August 1, 2016 00:30 IST

एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाद्वारे हिंगणघाट नगर परिषदेला अंगणवाडी बांधकामासाठी निधी आला.

नगरसेविकेचा पत्रपरिषदेत आरोप : चौकशीकडे दुर्लक्ष झाल्यास पोलिसात तक्रार करणार हिंगणघाट : एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाद्वारे हिंगणघाट नगर परिषदेला अंगणवाडी बांधकामासाठी निधी आला. या निधीत ५२ अंगणवाडींचे बांधकाम करावयाचे होते. असे असताना केवळ २८ अंगणवाडीचे बांधकाम झाले आहे. शिवाय झालेले बांधकाम सदोषपूर्ण असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेविका शुभांगी डोंगरे यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेतून केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत हिंगणघाट नगर परिषदेला ५२ अंगणवाडींच्या बांधकामाकरिता १ कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. न.प.च्या बांधकाम विभागाचे अभियंता विश्वनाथ माळवे यांनी या अंगणवाडी बांधकामाच्या आदेशात स्वत:च्या मर्जीने बदल करून केवळ ५० पैकी ४२ अंगणवाडीला मंजुरी दिली. शहरातील विविध प्रभागात यापैकी केवळ २८ अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. या काही अपूर्ण व काही पूर्ण झालेल्या बांधकामांना भेटी दिल्या असता सदर बांधकामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आले. सर्वच अंगणवाडीच्या छताला गळती लागली आहे. काही स्वयंपाकाचा ओटा, जमीनदोस्त झालेला आहे. तर काही अंगणवाडीची दारे तुटलेली आहेत. नव्याने बांधलेल्या अंगणवाडीच्या इमारतींची केवळ सात महिन्यात दैनावस्था झाली आहे. यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेविका डोंगरे यांनी केला आहे. ४५० चौरस फुट जागेवरील एक अंगणवाडी बांधकामासाठी ४.५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तरीही हे काम निर्धारित रकमेपेक्षा १७.५० टक्के अधिक दराने देण्यात आले. नगराध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश या प्रकरणी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्याधिकारी जगताप यांनी २ आॅगस्टपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी दिलेल्या कालावधीत कार्यवाही न केल्यास स्वत: अभियंता माळवे व संबंधित कंत्राटदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याचे शुभांगी डोंगरे यांनी यावेळी सांगितले. ३० जुलैला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडला. त्यावर २० मिनिटे चर्चा झाली असून नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही डोंगरे यांनी यावेळी सांगितले.