लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे): ऐन बैलपोळ्याच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक २ मधील २७ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळून आल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर लागलीच उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु झाली.शहरातील नदी पलीकडील प्रभाग क्रमांक २ मधील युवक ९ ऑगस्टला नागपूर येथे साक्षगंधासाठी गेला होता. तेथून आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आज तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता गेला. येथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील आई-वडीलांचेही अहवाल तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. रुग्ण सापडल्याने नगरपालिका, महसूल, पोलीस व आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना सुरु केल्या. या परिसरातील १७ घरे कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आली असून संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहे.
सिंदीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST
शहरातील नदी पलीकडील प्रभाग क्रमांक २ मधील युवक ९ ऑगस्टला नागपूर येथे साक्षगंधासाठी गेला होता. तेथून आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आज तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता गेला. येथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील आई-वडीलांचेही अहवाल तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे.
सिंदीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : पोळा सणाच्या तोंडावर रुग्ण सापडल्याने गावात भीतीचे वातावरण