लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाचा फटका स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे), देवळी, आर्वी या सहाही नगरपालिकांना बसला आहे. कोरोना योद्धा म्हणून पालिकेतील अधिकारी व कर्मचारी खबरदारीच्या उपाय योजनांची अंमलबजावणी करीत असल्याने कर वसुलीकच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. परिणामी सहाही नगरपालिकांची आतापर्यंत केवळ ३३ टक्केच कर वसुली झाली आहे. एकूणच कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील नगरपालिकांना किमान १०.२७ कोटींचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये सध्या एकूण १ हजार ६९ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतना पोटी तसेच सेवानिवृत्तांच्या पेंशनसाठी प्रत्येक महिन्याला किमान ५ कोटी ८३ लाख २४ हजारांचा निधी खर्च केला जात आहे. शासकीय नियमांना अनुसरून शहरातील नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठीचे काम या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत आहे. पण याच कर्मचाऱ्यांवर कोरोना काळात विविध कामांची अंमलबजावणी करण्याची अतिरिक्त जबाबदारी लादण्यात आली आहे. त्यामुळे पालिका अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांकडून नियोजित अपेक्षीत असलेल्या विविध कामांना ब्रेक लागल्याचेच चित्र सध्या बघावयास मिळत आहे.
कोरोनामुळे सहा नगरपालिकांना १०.२७ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये सध्या एकूण १ हजार ६९ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतना पोटी तसेच सेवानिवृत्तांच्या पेंशनसाठी प्रत्येक महिन्याला किमान ५ कोटी ८३ लाख २४ हजारांचा निधी खर्च केला जात आहे. शासकीय नियमांना अनुसरून शहरातील नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठीचे काम या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत आहे.
कोरोनामुळे सहा नगरपालिकांना १०.२७ कोटींचा फटका
ठळक मुद्देकेवळ ३३ टक्केच झाली करवसुली : नियोजित विविध कामांना ब्रेक, संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी करावे लागताहेत प्रयत्न