शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डबघाईस आलेल्या सहकारी बँका शिखर बँकेत विलीन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:29 IST

कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच विदर्भातील तीन बँकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.राज्यात वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्हा सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या आहे. या बँकांमधील आर्थिक व्यवहार बंद झाले असून सर्वसामान्य शेतकरी, नौकरदार यांचे पैसे यात अडकून पडले आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २ लाख २० हजार खातेदारांचे ३२५ कोटी रूपये अडकून पडले आहेत. सदर बँकेला केंद्र सरकारने आर्थिक मदत केली. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तीनही बँकांना रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाला आहे. परंतु या बँकांकडून झालेल्या कर्जवाटपाची वसुली झालेली नाही. राज्य सरकारने कर्जमाफी दिली असल्यामुळे ही रक्कम धरून वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरळीत होण्यासाठी १०० कोटी रूपयाची गरज आहे. ही बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करावी, अशी मागणी वर्धेचे भाजप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सातत्याने लावून धरली आहे. गेल्या दोन अधिवेशनात त्यांनी या संदर्भात लक्षवेधी लावून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर लक्ष घातले व ३ आॅक्टोबरला मुंबई येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थिती बैठक झाली. या बैठकीत राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविला. त्यानंतर आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली व वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करावी, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. गुरूवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना त्यांनी वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले. व याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.खातेदाराची रक्कम सुरक्षीत राहावी यासाठी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शासन दरबारी हा प्रश्न लावून धरण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंगी येथील शासकीय कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. हा निर्णय लवकरच होईल व जिल्हा सहकारी बँकेत पैसे अडकून पडलेल्या सर्व सामान्य लोकांना दिला मिळेल, असा मला विश्वास आहे.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस