शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर इंटरनेट वापराने सायबर कॅफेवर संक्रांत

By admin | Updated: December 30, 2014 23:43 IST

काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची

वर्धा : काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची नेहमीच गर्दी असायची. परंतु वर्षभरापासून जिल्ह्यातील युवकांच्या हाती दिसत असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्रांत आली आहे. सध्याचे जग तंत्राज्ञानाने आणि त्यातही मोबाईलक्रांतीने भारले गेले आहे. आजचे तंत्रज्ञान उद्या जुने होत आहे. टॅबबरोबर दररोज बाजारात येणारे नवीन तंत्रज्ञान सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळत आहे़ विकसित तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज व वेगाने उपलब्ध होणारे इंटरनेटमुळे सध्या जग चांगलेच वेगवान झाले आहे़ जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, त्वरित ती आपल्यापर्यंत पोहोचते़ गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून बिल भरणे, स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरणे, सोशल मीडिया वापरण्यापर्यंतची सर्वच कामे हातातल्या मोबाईल, टॅबच्या माध्यमातून होतात़ साधारणपणे १० ते १२ वर्षांपूर्वी सायबर कॅफे या प्रकाराला सुरुवात झाली. इंटरनेटवरून कुठलीही माहिती घ्यावयाची असल्यास इंटरनेट कॅफेतच जावे लागत होते. ते ही शहरातच असल्याने ग्रामीण भागातील युवकांची तारांबळ उडायची. तसेच फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटची भुरळ पडल्याने इंटरनेट कॅफेतच युवकांचा ठिय्या असायचा. सोबतच इंटरनेट वरील गेमही खेळण्याची क्रेझ वाढली. त्यामुळे इंटरनेट कॅफेमालकांचा व्यवसाय तेजीत होता. परंतु गत दोनच वर्षात स्मार्टफोन अत्यल्प किमतीत मिळायला लागल्याने आणि त्यामध्ये इंटरनेट सहज वापरता येत असल्याने युवकांच्या खिशात इंटरनेट सामावले गेले. यामुळे साहाजिकच कॅफेकडे जात असणारी पावले थांबून आता मोबाईलवर बोटे फिरू लागली. त्यातच व्हॉट्स अ‍ॅप, हाईक, वी चॅट यासारखी खास मोबाईल साठीची संवाद साधने आल्याने स्मार्ट फोनचा वापर जिल्ह्यात अतोनात वाढला असून इंटरनेट कॅफे कमी होत आहे. केवळ शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी ग्रामीण भागात कॅफेचा उपयोग होत आहे.(शहर प्रतिनिधी )